Header Ads

जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद, पोलिसांचे पथ संचलन

कळंबमध्ये पोलिसांवर पुष्पवृष्टी, महिलांकडून पोलिसांचे औक्षण


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ( रविवारी ) जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता, त्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील कळंब मध्ये पोलिसांवर जनतेने पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन केले.रविवारी ( ३ मे )  जिल्हा प्रशासना तर्फे जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले होते.   त्या पार्श्वभुमीवर जनतेने घरा बाहेर विनाकारण पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी निर्माण करु नये, या उद्देशाने पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरातील 18 पोलीस ठाण्यां मार्फत आपापल्या हद्दीत पोलीस दलाचे पथ संचलन (रुट मार्च) करण्यात आले.  या पथ संचलनात संबंधीत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व दंगा काबू पथके, पो.ठा.चे अधिकारी, कर्मचारी सामील झाले.


कळंबमध्ये पोलिसांनी काढलेल्या पथ संचलन वेळी काही नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, काही महिलांनी त्यांचे औक्षण केले तर काहींनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.पाहा व्हिडीओ No comments