Header Ads

उस्मानाबादेत एका डॉक्टरचे १५ लाख लांबवलेउस्मानाबाद -  डॉ. आदिनाथ राजगुरु रा. अक्षय हॉस्पीटल, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी जानेवारी 2020 ते 29.04.2020 या कालावधीत घरातील कपाटात वेळोवेळी रोख रक्कम ठेवली होती. दि. 29.04.2020 रोजी हिशोब करतांना एकुण रकमेत 15,00,000/-रु. कमी आढळले. याबाबत त्यांनी पत्नीस विचारले असता पत्नीनेही त्या रकमे बाबत काही माहिती नसल्याचे सांगीतले. यावरुन दरम्यानच्या काळात ही रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या डॉ. आदिनाथ राजगुरु यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


पाडोळी येथे धाडसी चोरी 

बेंबळी - रावसाहेब वसंत गुंड रा. पाडोळी (आ.), ता. उस्मानाबाद यांच्यासह गावातील महादेव त्रिंबक पवार व रंगनाथ हरिश्चंद्र गुरव यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दि. 30.04.2020 रोजी 02.00 ते 03.00 वा. चे दरम्यान प्रवेश करून रावसाहेब गुंड याची सुन- मुक्ता यांना चाकुने हातावर वार करुन त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र, व पायातील चांदीचे दागिने व कपाटातील दागिने जबरीने काढून घेतले. तसेच वरील अन्य दोघांच्या घरातील सोने- चांदी व दोन मोबाईल फोन असा एकत्रीत 2,47,250/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रावसाहेब गुंड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments