Header Ads

आजपासून  सर्व दुकाने उघडण्यास अखेर परवानगी

जिल्हाधिकारी यांनी काढला आदेश उस्मानाबाद - लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवस बंद असलेले सर्व दुकाने आजपासून  (४ मे )उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी नियम, अटी , शर्ती घालून सर्व  व्यवहार सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला आहे.-  दूध, भाजीपाला केंद्रे, भाजीपाला फिरते विक्रेते, सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेतच चालू ठेवण्यात येतील

- जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने, चष्माच्या दुकानाह  २४ तास चालू राहतील.

- जिल्ह्यातील कृषी विषयक बी- बियाणे, खते,  कृषी अवजारे, स्पेयर पार्टस सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील.

- इतर सर्व आस्थापना सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत चालू राहतील.

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन असला तरी शेजारचा सोलापूर जिल्हा रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दुकानदारांनी  ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखून मास्क, सॅनिटायझर यांचा वापर  करावा तसेच दिलेल्या वेळेतच दुकाने उघडी ठेवावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकरी यांचा आदेश पाहा 2 comments

Unknown said...

Pan shop ughade rahtil ka nahi

Unknown said...

👌🏻🙏