Header Ads

उस्मानाबादेत दारूची दुकाने बंदच राहणार

 जिल्हाधिकारी  यांचा नवीन आदेश   


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत  दारू विक्री करता येईल हा यापूर्वीचा आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी मागे घेतला आहे. 


यापूर्वीचे वृत्त 

उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी, पण...

उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशीच सकाळी १० ते दुपारी १ या वेळेतच दारू विक्री करता येईल असा  आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी सोमवारी  काढला होता.  उद्या दारूची दुकाने उघडणार असे वाटत असताना हा आदेश मागे घेण्यात आला आहे. 

दारूच्या दुकानासमोर लांबच्या लांब रांग लागत असल्याचे चित्र पुणे, मुंबईत पाहावयास मिळाले. उस्मानाबादेतही तशीच गर्दी होईल, हे गृहीत धरून  हा आदेश मागे घेण्यात आल्याचे कळते. आदेश पाहा 

काय म्हटले आहे आदेशात ? 


 शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांस अनुसरुन उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्यविक्री दुकाने वगळून, जिल्ह्यातील इतर एफएल-2, सीएलएफएलटीओडी-3 अनुज्ञप्ती (वाईनशॉप), एफएलबीआर-2(बिअरशॉपी) व सीएल-3 अनुज्ञप्ती (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) दि. 4 मे 2020 पासून सुरु करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.
          या आदेशात अंशत: बदल करुन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) च्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व देशी मद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3) देशी, विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4 सीएलएफएलटीओडी-3), तसेच बिअर किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएलबीआर-2) आणि एफएल-1, सीएल-2 या अनुज्ञत्या दि. 6 मे, 2020 पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारीत करीत आहे.
             या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा, 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची सर्व अनुप्तीधारकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आदेश दिले आहेत. 

हिंदु जनजागृती समितीचे निवेदन 

एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनतेच्या जिवावर बेतू नये, म्हणून सरकारांनी आर्थिक हानी सहन करत ‘दळणवळण बंदी’चा धाडसी आणि स्तुत्य निर्णय घेतला; मात्र दुसरीकडे केवळ महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला ! यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढण्याचा धोका संभवतो. याशिवाय दारूमुळे होणारे महिलांवरील अत्याचार, मुलांवर होणारे चुकीचे संस्कार अन् उद्ध्वस्त होणारे लाखो संसार हे या निर्णयाचे फलित होऊ नये, यास्तव समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले होते. सविस्तर बातमी वाचा 

3 comments

Unknown said...

Ok

AMBADAS V GORE said...

दारूचे दुकान सुरू करणे म्हणजे हे तिसरं संकट ओढवून घेण्यासारखे आहे.
घरी कुटुंबत मारहाण, गोंधळ, सामाजिक सलोखा किती बिघडेल....? व तळीराम घरी किराणा साहित्य पूरवणे सोडून दररोज दारु पिऊन रातभर धिंगाणा होईल...
हा सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा.

Unknown said...

Very bad news