अणदूर येथे कोरोना वॉरियर्सवर पुष्पवृष्टी

आशा कार्यकर्त्या, परिचारिका, अंगणवाडी सेविका,  सफाई कामगारांचा सन्मान


अणदूर -  येथील श्री खंडोबा को ऑफ क. फार्मिंग सोसायटीचे चेअरमन व जय मल्हार  पत्रकार संघाचे सदस्य सुदर्शन भगवान मोकाशे यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने अणदूर येथील कोरोना वॉरियर्सवर गुलाब पुष्पवृष्टी करून गावातील वैद्यकीय अधिकारी ,आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, परिचारिका, कोरोना कक्षातील सदस्यासह गावातील सफाई कामगारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


कोरोनाच्या महासंकटामध्ये जीवाची पर्वा न करता, कोरोणाशी लढा देणाऱ्या, घरोघर जाऊन जाणीव जागृती करून सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून कोरोनापासून दूर व प्रतिबंध करण्यासाठी घरोघरी जाऊन थर्मिंग स्क्रीनिंग टेस्ट करून योग्य सल्ला व समुपदेशन करणाऱ्या कोरोना वारिअर्सचा यथोचित सन्मान जय मल्हार पत्रकार संघाचे सदस्य सुदर्शन मोकाशे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त खर्चाला फाटा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

सकाळी ९ वाजता अंगणवाडी कार्यालयासमोर ज्येष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, सरपंच सरिता मोकाशे, पं स सदस्य वैशाली मुळे ग्रामपंचायत सदस्य अलका बिराजदार, सुरेखा भगवान मोकाशे, वर्षा सुदर्शन मोकाशे, राणी संदीप मोकाशे यांच्या हस्ते अंगणवाडी कार्यकर्त्या नागिनी सदाफुले, राहीबाई सोनकवडे, माया जाधव, श्रीदेवी करपे, विजया कंदले, जयश्री ढेपे, उलन कस्तुरे, वैजंता बोंगरगे, राधिका बारगळ, सिंधुबाई ढवळे, वैशाली हंड्रे, महादेवी वाघे, विशाखा गायकवाड, सुरेखा बेडगे यांच्यावर पुष्पवृष्टी करून भावा न कडून बहिणींना साडी-चोळी , मास्क व फराळाचे साहित्य भेट देण्यात आले.

सकाळी 9:30 ला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ जितेंद्र कानडे, डॉ नागनाथ कुंभार, माजी सभापती बालाजी मोकाशे, अलका बिराजदार यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश गायकवाड, डॉ आकांक्षा गायकवाड ,राजश्री चव्हाण, अनुराधा पापडे, धोंडीराम कदम, डॉ विवेक बिराजदार ,सुरेखा कांबळे, जयश्री तळवार, सुनिता मोकाशे, सत्यशीला चव्हाण, संगीता कीरात ,मनीषा कांबळे, चंदा सूर्यवंशी ,शिवशाला घुगे, लक्ष्मी दुपारगुडे ,आशा बोर्डे, संगीता गवळी ,चंदा कांबळे, सुमन जमादार, निता साखरे, वर्षा पाटील ,पूनम जाधव ,नंदू ढेपे, श्री डुकरे श्री बेंगळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून साडीचोळी, टोपी, पेन  शानिटायझर्स, मास्क, फराळाचे साहित्य देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
 सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोना कक्षातील ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, तलाठी विलास कोल्हे, पोलीस पाटील जावेद शेख ,मुख्याध्यापक यशवंत मोकाशे ,परमेश्वर भुजबळ, नितीन कांबळे ,पंढरी मातोळकर ,शंकर राठोड, अनदुर बीट अमलदार माळाळे साहेब यांच्यासह सफाई कामगारांचा यथोचित सन्मान करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यासाठी अजय अणदुरकर, दयानंद काळुंके, चंद्रकांत गुड्ड,संजिव आलुरे, सचिन तोग्गी,लक्ष्मण दुपारगुडे, शिवशंकर तिरगुळे, चंद्रकांत हागलगुंडे, अमोल मोकाशे, दिपक मोकाशे ,संदिप मोकाशे , नागेश मोकाशे ,आकाश स्वामी ,प्रसाद स्वामी, यांनी पुढाकार घेतला होता.
अणदूर येथे कोरोना वॉरियर्सवर पुष्पवृष्टि आशा कार्यकर्त्यां, परिचारिका,अंगणवाड़ी सेविका, सफाई कामगार यांचा सन्मान
Posted by Osmanabad Live on Sunday, May 17, 2020

No comments