परंडा तालुक्यात अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने बंद

 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण साईड इफेक्ट  उस्मानाबाद - परंडा येथे सोमवारी कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आल्यानंतर परंडा शहर आणि तालुक्यात काही अत्यवश्यक सेवा आणि जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना  बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काढला आहे.

गालबोट : उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्णउस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या ३७ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, त्यामुळे सर्व  दुकाने सुरु करण्याचा आदेश निघाला असताना, सोमवारी परंडा शहरात एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा  मुधोळ मुंडे यांनी  परंडा तालुक्यासाठी नवा आदेश काढला आहे.


काय सुरु राहणार ? 
  • शासकीय - निमशासकीय कार्यालय 
  • पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना 
  • सर्व बँका 
  • दूरध्वनी, इंटरनेट पुरवठा करणाऱ्या  आस्थापना 
  • अन्न, भाजीपाला, दूध 
  • किराणा मालाची दुकाने ( सकाळी ८ ते दुपारी २ )
  • दवाखाने, वैयकिय केंद्र, औषधी  दुकाने 
  • विद्युत पुरवठा, ऑईल, पेट्रोल पंप 
  • प्रसार माध्यमे, मीडिया 
  • अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व आस्थापना 

काय बंद राहणार ? 

वरील  आस्थापना  व दुकाने वगळून परंडा शहर आणि तालुक्यातील सर्व  आस्थापना  दि. १७ मे पर्यंत बंद राहतील.

स्वप्नभंग : उस्मानाबाद जिल्ह्यात एकच दिवसात एस. टी. बस सेवा बंद

No comments