चार वर्षांपुर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त- आरोपी अटकेत


स्थानिक गुन्हे शाखा:  पो.ठा. उस्मानाबाद ग्रामीण गु.र.क्र. 212/2016 या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एइ 3771 (किं.अं. 40,000/-रु.) सह आरोपी- आकाश प्रल्हाद काळे रा. शिंगोली तांडा, ता. उस्मानाबाद यास पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या. हि कारवाई स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, सपोफौ- बाळासाहेब खोत, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, पोना- अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, यांच्या पथकाने केली आहे. 

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, लोहारा: पो.ठा. लोहारा चे पोलीस पथक दि. 15.05.2020 रोजी 13.00 वा. पोलीस मित्रां सोबत सास्तुर शिवारात गस्तीवर होते. यावेळी निंबाळकर पेट्रोलियम विक्री केंद्रा समोर सचिन जयप्रकाश ढोणे रा. माकणी, ता. लोहारा व अन्य दोन अनोळखी पुरुष विनाकारण फिरतांना आढळले. त्यांना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल- लक्ष्मण उत्तम डिकोळे यांनी हटकले असता त्या तीघांनी डिकोळे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. अशा प्रकारे वरील तीघांनी पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन पोकॉ- लक्ष्मण डिकोळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद तीन आरोपींविरुध्द गुन्हा दि. 16.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments