Header Ads

“क्वारंटाईन इसमांचा सार्वजनिक वावर, 7 गुन्हे दाखल.”
उस्मानाबाद  मा.जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन महावीर हरकचंद बलाई रा. कळंब यांनी दि. 06.05.2020 रोजी कळंब येथील त्यांच्या कापड दुकानात ग्राहकांची गर्दी निर्माण केली असल्याचे पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळले. तर, लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश बंदी असतांनाही बाहेर जिल्ह्यातून आडवाटेने प्रवास करत पोलीस नाकाबंदीस टाळून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्याने 1)अशोक प्रभाकर आवाड 2)दिपाली अशोक आवाड दोघे रा. आवाडशिरपुरा, ता. कळंब 3)विकास सतिश शिंदे 4)नेहा विकास शिंदे दोघे रा. भाटशिरपुरा, ता. कळंब 5)सचिन भारत मस्के 6)नितीन भारत मस्के दोघे रा. बोरगांव (बु.), ता. कळंब 7)विष्णु प्रभु कांबहे रा. मंगरुळ, ता. कळंब या सर्वांना आपापल्या गावी प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. तरीही त्या सर्वांनी दि. 06.05.2020 रोजी नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरुन मानवी जिवीत धोक्यात येईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. तसेच, 1)अशोक आडसुळ 2)गणेश खोसे 3)संग्राम खोसे 4)सचिन कदम 5)सतीश पाटोळे सर्व रा. लोहटा (प.), ता. कळंब यांनी दि. 06.05.2020 रोजी लोहटा (प.) येथे सार्वजनिक ठिकाणी तर, मौजे खामसवाडी येथे 7)धनाजी पवार 8)संजय पौळ 9)युसूफ बेग सर्व रा. खामसवाडी, येथील साठे चौकात नाका- तोंडास मास्क न लावता एकत्र जमलेले पोलीस पथकास आढळले.

यावरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 7 गुन्हे दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 26 वाहने जप्त.”

उस्मानाबाद- लॉकडाउनचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 06.05.2020 रोजी परंडा पो.ठा.- 9, तामलवाडी- 1, कळंब अशी एकुण 26 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments