उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे ५ गुन्हे दाखलपोलीस ठाणे, वाशी: अमोल चत्रभुज चोरघडे रा. बोरगांव (ध.), ता. कळंब यांना दि. 08.05.2020 रोजी 14.00 वा. सु. मौजे बोरगांव येथील जि.प. शाळे समोर आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन भाऊबंद- सचिन मच्छिांद्र चोरघडे, महेश चोरघडे यांनी शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अमोल चोरघडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 08.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: उत्तरेश्वर ज्ञानोबा घुगे रा. हगलुर, ता. तुळजापूर यांनी त्यांची चुलती- सिंधुबाई यांचे शेत बटईने केल्याचा राग मनात धरुन व त्या शेतातून हरदारीच्या कारणावरुन उत्तरेश्वर घुगे यांच्यासह भाऊ- रामेश्वर घुगे या दोघांना दि. 08.05.2020 रोजी मौजे हगलुर शेत गट क्र. 2 मध्ये भाउबंद- तात्याराव घुगे, लक्ष्मण घुगे, अंबादास घुगे, महेश घुगे यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शेत बटईने केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उत्तरेश्वर घुगे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 08.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): नितीन तानजी भोसले रा. गणेशनगर, उस्मानाबाद हे दि. 06.05.2020 रोजी 18.30 वा. सु. मसोबा चौक, उस्मानाबाद येथे दुकानी गेले होते. यावेळी भांडणाची कुरापत काढून शाम वाडकर याने नितीन भोसले यांना शिवीगाळ - धक्काबुक्की करुन, दगड डोक्यात मारुन जखमी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच नितीन भोसले यांच्या मोटारसायकलचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या नितीन भोसले यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 08.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, आंबी: हरिश्चंद्र लक्ष्मण सुर्यवंशी रा. बंगाळवाडी, ता. परंडा यांच्यासह त्यांच्या भावास दि. 08.05.2020 रोजी 18.00 वा. सु. मौजे बंगाळवाडी शेत शिवारात पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून गावातीच- गणेश सुर्यवंशी, नवनाथ सुर्यवंशी, अजिनाथ सुर्यवंशी यांनी शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दरिश्चंद्र सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 09.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: पल्लवी दत्ता कदम रा. हाडको, तुळजापूर या दि. 08.05.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर थांबल्या होत्या. यावेळी शेजारील- अजिक्य खंदारे, ऊर्मिला खंदारे, ऐश्वर्या खंदारे, प्राजक्ता खंदारे, नाना देशमुख व अनय्‍ एक स्त्री यांनी मिळुन पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून पल्लवी यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, सळई, लाकडी फळीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पल्लवी कदम यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 09.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
                                                                                     

No comments