Header Ads

बोअर मशीन चालकाच्या निष्काळजीपणामुळे सहायक जखमी


 परंडा: गणेसम के. रा. किरीपट्टी, ता. आतुर, जि. श्रीशैलम, राज्य- तामीळनाडू (बोअर मशीन चालक) हे दि. 09.05.2020 रोजी 07.30 वा. सु. आडवापाव, ता. परंडा येथे बोअर मशीन क्र. केए 01 एमटी 8979 ने विंधन विहीरीचे खोदकाम करत होते. दरम्यान त्यांनी बोअर मशीन सहायक- डी. कलायमणी रा. किरीपट्टी, ता. आतुर, जि. शेलम यांना मशीन वर बसवलेली दोरी काढण्यास सांगीतले असता तो मशीनवर चढून वायर काढू लागला. दरम्यान गणेसम यांनी बोअर मशीन निष्काळजीपणे अचानक चालू केल्याने दोरी तुटून अडकवलेला पाईप डी.कलायमणी यांच्या डोक्यावर पडुन ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दिपक रेवडकर रा. उपळवटे, ता. माढा यांच्या फिर्यादीवरुन वरील बोअर मशीन चालकाविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.मारहाण.”
पोलीस ठाणे, आंबी: दि.09.05.2020 रोजी 23.00 वा. सु. मौजे कुक्कडगांव, ता. परंडा येथे भास्कर रावसाहेब ताकमोडे अन्य 3 व्यक्ती तीघे रा. कुक्कडगाव यांचा शेजजमीन खरेदी- विक्री व्यवहारावरुन गावातीलच- गणेश ज्योतीराम वायसे व अन्य 2 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. आंबी येथे दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: रुक्मीनी रविंद्र देवकर रा. कार्ला, ता. तुळजापूर या दि. 09.05.2020 रोजी 08.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी असतांना पुर्वीच्या भाडणावरुन व आर्थिक व्यवहारावरुन रविंद्र प्रकाश देवकर, चित्रलेखा देवकर व अन्य 2 व्यक्ती सर्व रा. कार्ला यांनी रुक्मीनी देवकर यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रुक्मीनी देवकर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: किरण भाऊसाहेब पाटील रा. देवळाली यांनी गावकरी समाधान सातव, साजीद शेख, लक्ष्मण सातव, अमर कदम, विकास सातव, बालाजी सुरवसे, युवराज तांबे, बाजीराव तांबे, बाबासाहेब गिलबीले, रोहीत माळी, राजाभाऊ सुरवसे सर्व रा. देवळाली, ता. भुम यांच्याविरुध्द जि.प. उस्मानाबाद येथे तक्रार अर्ज दिला होता. त्याचा राग मनात धरुन वरील सर्वांनी किरण पाटील यांना दि. 09.05.2020 रोजी 14.00 वा. सु. देवळाली शिवारात लाथाबुक्क्यांनी, काठी- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच समाधान सातव यांच्या चिथावणीवरुन साजीद शेख, लक्ष्मण सातव व अमर कदम यांनी एक्सकॅव्हेटर यंत्र व ट्रॅक्टर किरण पाटील व त्यांच्या सोबत असलेले मधुकर तांबे, दिनकर गोरे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या किरण पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील सर्वांविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments