लॉकडाउन- आदेश डावलून दुकान चालू ठेवली, गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात केशकर्तनालय बंदीचे आदेश असतांनाही दि.08.05.2020 रोजी त्या आदेशाची अवहेलना करुन 1)सुनिल अभिमन्यु घागरे रा. सिंदफळ 2)तुकाराम सोपान लोखंडे रा. बार्शी यांनी तुळजापूर येथील जुन्या बसस्थानका मागील ‘व्हीआयपी मेन्स पार्लर’ व्यवसायासाठी खुले ठेवले.  तर, सलीम नजीम काझी रा. गालीबनगर, उस्मानाबाद यांनी दि. 08.05.2020 रोजी ताजमहाल चित्रमंदीर जवळील आपल्या दुकानात ग्राहकांत सुरक्षीत अंतर न ठेवता गर्दी निर्माण केली.
            यावरुन वरील तीघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 21 वाहने जप्त.”
उस्मानाबाद : लॉकडाउनचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 07.05.2020 रोजी कळंब पो.ठा.- 18, तामलवाडी- 3, अशी एकुण 21 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments