चोरीच्या वेल्डींग मशीनसह आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: अभिषेक राधेशाम मिश्रा रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी मौजे हंगरगा शिवारातील बायपास रोड वरील बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेली मालवा इलेक्ट्रीक & इंजिजिअरींग कंपनीची वेल्डींग मशीन (किं.अं. 90,000/-रु.) दि. 09.02.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. यावरुन अज्ञात चोरट्याविरध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
            सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- दिपक शेषराव पवार रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद यास ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली वरील वेल्डींग मशीन जप्त केली आहे. पुढील तपासकामी मुद्देमालासह आरोपीस पो.ठा. तुळजापूर यांच्या ताब्यात दिले.     


लॉकडाउन- दुकानांत ग्राहकांची गर्दी जमवली, गुन्हे दाखल.”

पोलीस ठाणे, तुळजापूर: 1)प्रमोद सर्जेराव चव्हाण 2)शंकर महादेव गायकवाड दोघे रा. तुळजापूर यांनी दि. 15.05.2020 रोजी आपापल्या ताब्यातील कापड दुकानांत ग्राहकांत पुरेसे सुरक्षीत अंतर न राखता ग्राहकांची गर्दी निर्माण केली. यावरुन त्यांच्या विरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 15.05.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे.

No comments