तीन रस्ते अपघात, 2 मयत.”बेंबळी: राहुल उमाकांत जाधव वय 34 वर्षे, व राहुल लिंबराज वाळवे दोघे रा. भंडारी, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 21.05.2020 रोजी 20.30 वा. सु. तुळजापूर ते लातुर रस्त्याने युनिकॉर्न मोटारसायकलने प्रवास करत होते. दरम्यान सार्थक हॉटेल समोर ट्रक क्र. एम.एच. 26 एडी 1298 च्या अज्ञात चालकाने ट्रक निष्काळजीपणे, हयगईने चालवून राहुल जाधव चालवत असलेल्या युनिकॉर्न मो.सा. ला पाठीमागुन धडक दिली. यात सदर मो.सा. ही समोरील ट्रॅक्टर क्र. एम.एच. 24 एएस 0844 ला पाठीमागुन जाउन आदळली. या अपघातात राहुल जाधव यांच्यासह मो.सा. वर पाठीमागे बसलेले राहुल वाळवे मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता नमुद ट्रक चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन वाहनासह निघुन गेला.
अशा मजकुराच्या मेघराज काशीनाथ पाटील रा. भंडारी यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 22.05.2020 रोजी नोंदवला आहे.


उमरगा: अमोल सिध्दराम पाटील रा. लोहगाव, ता. तुळजापूर व भाग्यश्री प्रभाकर बिराजदार वय 13 वर्षे रा. उमरगा हे दोघे दि. 19.05.2020 रोजी 18.00 वा. सु. मौजे तुरोरी येथील उड्डान पुलाच्या जवळ मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 9033 ने प्रवास करत होते. दरम्यान अमोल पाटील यांनी मो.सा. निष्काळजीपणे चालवल्याने ती अनियंत्रीत होउन घसरली. यात मो.सा. वर पाठीमागे बसलेली भाग्यश्री बिराजदार हिच्या डोक्यास मार लागून डावा हात मोडला आहे.
अशा मजकुराच्या प्रभाकर सखाराम बिराजदार रा. उमरगा यांच्या फिर्यादीवरुन अमोल पाटील याच्याविरुध्द गुन्हा दि. 22.05.2020 रोजी नोंदवला आहे.उमरगा: माधव दादारा संगमे व अर्जुन दादाराव संगमे दोघे रा. उमरगा हे दोघे भाऊ दि. 12.05.2020 रोजी 07.30 वा. सु. उमरगा येथील एन.एच. 65 पर्यायी रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 9955 ने प्रवास करत जात होते. दरम्यान माधव संगमे यांनी मो.सा. निष्काळजीपणे चालवल्याने वळणावर ती अनियंत्रीत होउन घसरली. या अपघातात मो.सा. वर पाठीमागे बसलेले अर्जुन संगणे यांना गंभीर दुखापत होउन त्यांच्या डाव्या खांद्याचे हाड मोडले आहे.
अशा मजकुराच्या अर्जुन संगमे यांनी उपचारानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन माधव संगमे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 23.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments