Header Ads

सहा वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी अटकेत उस्मानाबाद - पो.ठा. भुम गु.र.क्र. 72/2014 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- किसन छगन काळे रा. भूम हा गेली सहा वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. त्यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 29.05.2020 रोजी भूम येथील पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी भुम पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, यांच्या पथकाने केली आहे.

लॉकडाउन: दि. 28.5.2020 रोजी 115 पोलीस कारवायांत 24,500/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 32 कारवायांत- 6,400/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 8 कारवायांत- 4,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 75 कारवायांत 14,100/-रु. दंड प्राप्त झाला आहे.

No comments