रस्ता अपघात, एक मयत


पोलीस ठाणे, नळदुर्ग: धनु बध्दु चव्हाण वय 55 वर्षे, रा. इंदीरा नगर तांडा (न.), ता. तुळजापूर यांच्या सोबत त्यांच्या मुलगा- राजु धनु चव्हाण हे दोघे दि. 03.03.2020 रोजी 11.00 वा. सु. नळदुर्ग येथील कदम शोरुच्या समारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर मो.सा. क्र. एम.एच. 25 व्ही 7581 ने प्रवास करत जात होते. दरम्यान वाहन क्र. एच.आर. 26 बीए 4169 च्या अज्ञात चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून धनु चव्हाण चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात धुन चव्हाण हे मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह निघुन गेला. अशा मजकुराच्या पो.ठा. आकस्मात मृत्यु क्र. 23/2020 च्या चौकशीत राजु चव्हाण यांनी दिलेल्या जबाबावरुन वरील वाहन चालकाविरुध्द गुन्हा दि. 11.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments