Header Ads

दोन गुन्ह्यांतील दोन 'वाँटेड’ आरोपी अटकेत पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 474/2018 या गुन्ह्यातील आरोपी- आतिश आकाश शिंदे रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद हा 2 वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. तर, पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 03/2020 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- केतन दिगंबर कदम रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हा हवा होता.  या दोन्ही आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 30.05.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ- खोत, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, कावरे, पोकॉ- पांडुरंग सावंत, सर्जे, ठाकूर, लाव्हरेपाटील, महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.रस्ता अपघात.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): बालाजी मुळे रा. उस्मानाबाद हे दि. 29.05.2020 रोजी 18.30 वा. सु. उस्मानाबाद येथील आदित्य पेट्रोल पंप समोरील रस्त्याने वाहन क्र. एम.एच. 25 एएन 1800 ही चालवत जात होते. यावेळी पिक अप क्र. एम.एच. 25 पी 2098 च्या अज्ञात चालकाने पिक अप निष्काळजीपणे, हयगईने चालवून बालाजी मुळे यांच्या नमुद वाहनास धडक दिली. या अपघातात बालाजी मुळे हे जखमी झाल्याने त्यांना स.द. उस्मानाबाद येथे वैद्यकीय उपचारकामी दाखल केले आहे. अशा मजकुराच्या शिवाजी शाहुराव निंबाळकर रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरुन वरील पिक अप च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 29.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, वाशी: सखाराम पांडुरंग कोकणे रा. जानकापुर, ता. वाशी हे आपल्या घराच्या छपावर झोपलेले असतांना दि. 29.05.2020 रोजी मध्यरात्री त्यांच्या विजारीच्या खिशातील रोख रक्कम 27,000/- रु. अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या सखाराम कोकणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 30.05.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments