Header Ads

लॉकडाउन: विनापरवाना जिल्हा प्रवेश, पोलीस पाटलांच्या तक्रारीवरुन 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 चा संसर्ग पसरु नये म्हणुन लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्हयात विनापरवाना प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असतांनाही 1)दिलीप बाबुराव जाधव 2)बालाजी जाधव 3)हिरालाल चव्हाण 4)मारुती जाधव 5)कांचन गायकवाड 6)नवीन गायकवाड 7)पवन गायकवाड सर्व रा. तलमोड, ता. उमरगा हे विनापरवाना, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदी टाळून बाहेर जिल्ह्यातून दि. 17.04.2020 ते 18.04.2020 या काळात मौजे तलमोड, ता. उमरगा येथे आले. तर दुसऱ्या घटनेत विजय विश्वनाथ आतकरे व दयानंद विश्वनाथ आतकरे दोघे रा. देवळाली, ता. कळंब हे आज दि. 29.05.2020 रोजी पोलीस नाकाबंदी टाळून, विनापरवाना प्रवास करत सोलापूर येथून मौजे देवळाली, ता. कळंब येथे आपल्या घरी येउन गुपचूपणे राहीले. तसे आल्याबाबत त्यांनी प्रशासनास कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.
अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील सर्व व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधीत कायदा कलम- 3 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments