Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : हाणामारीचे तीन तर चोरीचे दोन गुन्हे दाखल मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: बाळु सुग्रीव वायकर रा. सोनेगाव, ता. उस्मानाबाद व त्यांचे वडील हे दोघे दि. 12.05.2020 रोजी 09.00 वा. सु. स्वत:च्या राहत्या घरा समोर थांबले होते. यावेळी गावातीलच- अंकुश रामा रणखांब, नानासाहेब रणखांब, गुंजु रणखांब यांनी शेतातील झाडे तोडल्याचे भांडण उकरुन काढून बाळु वायकर व सुग्रीव वायकर या दोघा पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बाळु वायकर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: बालाजी वसंत काळे रा. शेरे गल्ली, कळंब हे दि. 10.05.2020 रोजी 18.00 वा. सु. त्यांच्या गल्लीतुन पायी चालत जात होते. दरम्यान गल्लीतीलच अमीर नवाज शेख यांनी मोटारसायकलवर येउन बालाजी काळे यांना जवळून हुलकावणी दिली. याचा जाब बालाजी काळे यांनी त्याला विचारला असता अमीर शेख, नवाज शेख, नुरजहा शेख यांनी बालाजी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाजी काळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: विजाबाई तेलंगे रा. दहिटना, ता. परंडा या दि. 11.05.2020 रोजी गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरत होत्या. यावेळी पाणी भरण्याच्या कारणावरुन भाऊबंद- आशाबाई तेलंगे, सुभाष तेलंगे यांनी विजाबाई यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विजाबाई तेलंगे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, तुळजापूर: अभिषेक राधेशाम मिश्रा रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी मौजे हंगरगा शिवारातील बायपास रोड वरील बांधकामाच्या ठिकाणी पत्र्याच्या शेडच्या बाजूस मालवा इलेक्ट्रीक & इंजिजिअरींग कंपनीची वेल्डींग मशीन ठेवलेली होती. ती मशीन दि. 09.02.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अभिषेक मिश्रा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुरेश वसंतराव मोकाशे रा. अणदूर, ता. तुळजापूर यांनी त्यांच्या राहत्या घरा समोर लावलेली त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 3531 ही दि. 01.05.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सुरेश मोकाशे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments