Header Ads

“निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने तरुणाचा मृत्यु.”


पोलीस ठाणे, आनंदनगर: मच्छिद्र कारकुन काळे वय 23 वर्षे, रा. साठेनगर, उस्मानाबाद यांनी दि. 24.05.2020 रोजी 02.30 वा. सु. डॉ. उस्मानाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्राच्या पाठीमागील रोडवर मो.सा. क्र. एम.एच. 13 सीएन 3273 ही निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रीत होउन घसरली. या अपघातात स्वत: मच्छिद्र काळे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या पो.ठा. आनंदनगर येथील पोहेकॉ- राजेश शेटे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद मयत व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण.”
पोलीस ठाणे, कळंब: बालाजी काळे, दविंद्र काळे , छाया काळे तीघेही रा. मस्सा, ता. कळंब यांनी दि. 18.05.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे मस्सा येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गावकरी- रविंद्र बप्पा काळे यांना तोंडावर दगड मारुन जखमी केले. भांडणे सोडवण्यास आलेल्या रविंद्र काळे यांच्या आई, भाउ यांनाही शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रविंद्र काळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: अनिल वामन समिंदर, विशाल समिंदर, अक्षय समिंदर तीघेही रा. हिंगणगाव (बु.), ता. परंडा या तीघा पिता- पुत्रांनी दि. 24.05.2020 रोजी मौजे हिंगणगाव (बु.) येथे पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- पांडुरंग साहेबराव समिंदर यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अक्षय समिंदर याने पांडुरंग समिंदर यांच्या कानावर धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पांडुरंग समिंदर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आंबी: अजित अशोक सावंत रा. रत्नापूर, ता. परंडा हे दि. 24.05.2020 रोजी त्यांच्या शेतातील विहिरीवर विद्युत पंप चालु करण्यासाठी गेले होते. यावेळी भाउबंद- नवनाथ गहिनीनाथ सावंत व सोनाली सावंत या दोघांनी अजित सावंत यांना विद्युत पंप चालू करण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, तोंडावर दगड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजित सावंत यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.
                                                                                     

No comments