Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, ढोकी: रुक्मीणी शिवाजी पवार रा. तडवळा, ता. उस्मानाबाद या दि. 26.05.2020 रोजी 09.30 वा. सु. गावातील आठवडी बाराज रात गेल्या होत्या. यावेळी त्यांना पाहुन दिलीप देवराव काळे, रामचंद्र काळे, लाला पवार, ताई काळे सर्व रा. गोपाळवाडी, ता. उस्मानाबाद यांनी शेत खरेदी व्यवहाराची कुरापत काढून रुक्मीणी पवार यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात रुक्मीणी पवार यांचा डावा हात मोडला आहे. पत्नी- रुक्मीणीस मारहाण करत असल्याचे पाहुन पती- शिवाजी पवार यांनी मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला आसता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रुक्मीणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.
\

पोलीस ठाणे, आंबी: गोरख केरबा खरात, अर्जुन गोरख खरात, जयश्री खरात सर्व रा. साकत (खु.), ता. परंडा यांनी संगणमताने दि. 26.05.2020 रोजी 18.30 वा. सु. मौजे साकत (खु.) शिवारात पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून भाऊबंद- सतीश विलास खरात व हनुमंत विलास खरात या दोघांना शिवीगाळ करुन, साखळीने, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सतीश खरात यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, येरमाळा: सिध्देश्वर चंद्रकांत भातलवंडे रा. दहिफळ, ता. कळंब हे दि. 27.05.2020 रोजी 19.30 वा. सु. गावातील एका दुकानासमोर थांबले होते. दरम्यान गावातीलच- शबीर शेख व अन्य 3 व्यक्तींनी तेथे येउन पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून सिध्देश्वर भातलवंडे यांना लोखंडी पाईपने, पट्ट्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सिध्देश्वर भातलवंडे यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतांविरुध्द गुन्हा दि. 28.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): तुकाराम दामोदर माने रा. विठ्ठलवाडी, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 14 एफबी 9510 (किं.अं.30,000/-रु.) ही दि. 25.05.2020 रोजी 12.30 वा. सु. उस्मानाबाद येथील सामान्य रुग्णाल्याच्या मुख्य गेटच्या बाजूस लावलेली ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या तुकाराम माने यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments