Header Ads

रस्ता अपघातात तरुणाचा मृत्यु


 ढोकी: शाम बाळासाहेब साळुंके वय 20 वर्षे, रा. नागझरवाडी, ता. कळंब हे दि. 16.05.2020 रोजी 12.30 वा. सु. तडवळा (क.) येथील खामसवाडी रस्त्याने पायी चालत जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 0214 च्या अज्ञात चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीपणे, हयगईने चालवून शाम साळुंके यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात शाम साळुंके हे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या बाळासाहेब संदीपान साळुंके (मयताचे पिता) यांच्या फिर्यादीवरुन नमुद ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 28.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments