Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, परंडा: लिंबराज किसन शिंदे रा. कारंजा, ता. परंडा हे दि. 26.05.2020 रोजी 20.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरातील विज गेल्याने गावठाणातील क्र. 1 च्या रोहित्रावर फ्युज टाकण्यासाठी गेले. दरम्यान तेथे शॉर्ट सर्कीट होउन आग लागल्याने त्या आगीत गावातीलच- हणुमंत गोरे यांची रोहित्राजवळ असलेली लाकडे जळाली. त्याकारणावरुन हणुमंत गोरे, दशरथ गोरे, धनाजी गोरे, सुग्रीव गोरे यांनी लिंबराज शिंदे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याच प्रकरणात सुग्रीव गोरे, धनाली गोरे, हणुमंत गोरे, सुनिता गोरे सर्व रा. करंजा, ता. परंडा यांना दि. 28.05.2020 रोजी 23.30 वा. सु. गावकरी- लक्ष्मण शिंदे, रामा शिंदे, लिंबराज शिंदे, सुरेश शिंदे यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.
अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. परंडा येथे नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, वाशी: अनिकेत गोंदवले, शिवाजी गोंदवले, सुरज गोंदवले, अनिता गोंदवले सर्व रा. ज्योतीबाचीवाडी, ता. भुम यांनी दि. 20.05.2020 रोजी 16.00 वा. सु. मोजे गिरलगांव शिवारात रविकीरण त्रिंबक रुपनावर रा. गिरलगांव, ता. भुम यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन शिवीगाळा करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. यात रविकिरण रुपनावर यांचा उजवा पाय मोडला आहे. अशा मजकुराच्या रविकिरण रुपनावर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 28.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, भूम: श्रीमती मयुरी रामदास निरपळ रा. पन्हाळवाडी, ता. भूम या कुटूंबासह दि. 29.05.2020 रोजी आपल्या राहत्या घरी होत्या. यावेळी गावातीलच- विलास ठोंबरे, अशोक ठोंबरे, लक्ष्मण ठोंबरे यांनी सामाईक शेतबांधाच्या कारणावरुन मयुरी निरपळ व त्यांच्या कुटूंबीयांना घरात घुसून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. अशा मजकुराच्या श्रीमती मयुरी निरपळ यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुद गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments