Header Ads

दोन गुन्ह्यांतील दोन पाहिजे (Wanted) आरोपी अटकेत


स्थानिक गुन्हे शाखा (       LCB): पो.ठा. लोहारा गु.र.क्र. 127/2019 भा.दं.वि. कलम- 498(अ), 306, 323, 504, 34 या गुन्ह्यातील आरोपी- गुरुराज सिद्राम हविले रा. जेवळी, ता. लोहारा हा 1 वर्षापासून पोलीसांना पाहिजे (Wanted) होता. तर, पो.ठा. परंडा गु.र.क्र. 133/2020 भा.दं.वि. कलम- 307, 324, 34 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- लक्ष्मण भारत सातव रा. देवळाली, ता. परंडा हा हवा होता. या दोन्ही आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 31.05.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, पोउपनि श्री. पांडुरंग माने, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, जगताप, थोरात पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.मारहाण.”
पोलीस ठाणे, उमरगा: बाबु राजु सोनकवडे, नविन दरवेश दोघे रा. उमरगा यांनी दि. 29.05.2020 रोजी 19.30 वा. सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र- 65 वरील जगदंब धाबा येथे जेवणाच्या कारणावरुन धाबा चालक- कृष्णा प्रकाश कांबळे रा. उमरगा यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. मारहाण सोडवण्यास आलेल्या कृष्णा कांबळे यांचा भाऊ- शुभम यांनाही नमुद दोघांनी मारहाण करुन बतईने अंगावर वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या कृष्णा कांबळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 30.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: समीर सिकंदर सय्यद रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 31.05.2020 रोजी 08.45 वा. मौजे दुधगाव येथील चौकात होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाची कूरापत काढून गावातीलच- हसन पठाण, सोहेल शेख, साहील शेख, मुकरम पठाण हे सर्व समीर सय्यद यांच्या सोबत वाद घालत होते. भाऊ- समीर सय्यद याचे सोबत वाद घालत असल्याचे पाहून आलम सय्यद हे भांडण तक्रारी सोडवण्यास गेले असतां त्यांनाही नमुद व्यक्तींनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आलम सय्यद यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, ढोकी: राजु रंगनाथ वाळजे रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांच्या ढोकी येथील ‘अक्षय मोटार गॅरेज’ या दुकानाच्या दरवाजाच्या खालचा पत्रा रमेश जनक लोमटे रा. नागुलगाव याने दि. 30.05.2020 रोजी 19.00 वा. सु. उचकटून आतील ड्रिल मोटार (किं.अं. 4,000/-रु.) ची चोरी केली. चोरी केलेली ड्रिल मोटार सिकंदर गफूर शेख उर्फ राजाभाऊ व जनाबाई दिनकर चव्हाण दोघे रा. ढोकी यांना पाचशे रु. दराने विकली. अशा प्रकारे रमेश लोमटे याने ड्रिल मोटार चोरली व ती चोरीची माहित असतांना देखील सिकंदर शेख व जनाबाई चव्हाण या दोघांनी विकत घेतली. अश मजकुराच्या राजु वाळजे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 31.05.2020 नोंदवण्यात आला आहे.

रस्ता अपघात.”
पोलीस ठाणे, येरमाळा: आप्पासाहेब दशरथ साठे रा. चोराखळी, ता. कळंब हे दि. 30.05.2020 रोजी 10.45 वा. सु. चोराखळी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मो.सा. क्र. एम.एच. 25 व्ही 6894 ही चालवत जात होते. दरम्यान सुनिल कुमार यादव रा. कसेरवा, ता. मच्छली शहर जि. जैनपुर राज्य- उत्तर प्रदेश याने ट्रक क्र. जी.जे. 01 एफटी 0828 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून आप्पासाहेब साठे चालतव असलेल्या मो.सा. ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात आप्पासाहेब साठे हे गंभीर जखमी झाले आहेत. अशा मजकुराच्या दशरथ श्रीपती साठे यांच्या फिर्यादीवरुन वरील नमुद ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 30.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments