Header Ads

भूम : पाच तलवारी जप्त, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे भूम: पो.ठा. भूम च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सलमान दस्तगीर पठाण रा. गालीबनगर, भूम याच्या राहत्या घरातून अवैध रित्या बाळगलेल्या 5 धारदार तलवारी दि. 30.05.2020 रोजी 12.50 वा. जप्त केल्या आहेत. यावरुन पो.नि. श्री. रामेश्वर खनाळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सलमान पठाण विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा पो.ठा. भूम येथे नोंदवला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: प्रकाश नागनाथ कुंभार रा. काटगाव, ता. तुळजापूर हे दि. 23.05.2020 रोजी 18.00 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी सामाईक शेताचा बांध टोकरल्याच्या कारणावरुन गावकरी- बिरा आनंदराव घोडके, दिगंबर घोडके, ज्ञानेश्वर धुते, भिमराव धुते, महादेव घोडके आणि कालीदास घोडके व त्यांचा मुलगा दोघे रा. सलगरा (दि.) यांनी प्रकाश कुंभार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच प्रकाश कुंभार यांच्यासह पत्नी- विजयाबाई कुंभार, मुलगा- हिराण्णा कुंभार हे दवाखान्यात जात असांना वरील नमुद व्यक्तींनी त्यांना आडवून लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. यात विजयाबाई कुंभार यांना फॅक्चर केले तर प्रकाश कुंभार व हिराण्णा कुंभार यांना जखमी केले. अशा मजकुराच्या प्रकाश कुंभार यंनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 29.05.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, बेंबळी: तानाजी थोरे, नेताजी थोरे दोघे रा. टाकळी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 26.05.2020 रोजी 06.00 वा. सु. मौजे टाकळी शिवारात शेतबांध फोडल्याच्या कारणावरुन गावातीलच- बाळासाहेब शिवाजी लोहार यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाळासाहेब लोहार यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 29.05.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, तुळजापूर: अनिल शाहु खंडागळे रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर हे दि. 26.05.2020 रोजी 21.30 वा. सु. कॉलनीतीलच- प्रकाश लहु कांबळे, किसन कांबळे, गोपी कांबळे यांना आपल्या पत्नी सोबत भांडन केल्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता नमुद तीघांनी अनिल खंडागळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्रकाश कांबळे यांनी अनिल यांच्या डोक्यात लोखंडी गज मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिल खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 29.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments