Header Ads

“छुप्या मार्गाने जिल्हा प्रवेश, गुन्हा दाखल.”


पोलीस ठाणे, शिराढोण: रामेश्वर बाळासाहेब भंडारे रा. शिराढोण, ता. कळंब यांनी लॉकडाऊन काळात दि. 12.05.2020 रोजी धारावी, मुंबई ते शिराढोण असा आडवाटेने, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदीस टाळून प्रवास करत उस्मानाबाद जिल्ह्यात येउन शिराढोण येथील त्यांच्या शेतात गुपचूपपणे राहीले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये गुन्हा दि. 12.05.2020 रोजी नोंदवला आहे.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 2 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन असतांनाही दि.11.05.2020 रोजी जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर येणाऱ्यांची 2 वाहने पो.ठा. तामलवाडी यांनी ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन: दि. 12.5.2020 रोजी 268 पोलीस कारवायांत 73,800/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 144 कारवायांत- 28,800/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 33 कारवायांत- 16,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 68 कारवाया करुन 16,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 1 कारवाई करुन 1,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
5)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारसायकलवर फक्त चालक स्वत:, तर कार मध्ये चालकाशिवाय फक्त एक प्रवासी अशी मर्यादा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुध्द 22 कारवाया करुन 11,500/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

No comments