Header Ads

लॉकडाउन: विनापरवाना जिल्हा प्रवेश केल्याने गुन्हा दाखलपोलीस ठाणे, तामलवाडी: कोविड- 19 चा संसर्ग पसरु नये म्हणुन लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्हयात विनापरवाना प्रवेश करण्यात बंदी आहे. असे असतांनाही प्रशांत शरणप्पा गायकवाड रा. वळसंग, ता. सोलापूर (द.) हे विनापरवाना, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदी टाळून सोलापूर जिल्ह्यातून दि. 27.05.2020 रोजी मौजे धोत्री, ता. तुळजापूर येथे आले. अशा प्रकारे त्यांनी लॉकडाऊन काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- दत्तात्रय पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.

लॉकडाउन: तंबाखुजन्य पदार्थाची विक्री केली, 2 गुन्हे दाखल.”
उस्मानाबाद जिल्हा: तंबाखु- तुबाखुजन्य पदार्थाची विक्रीस मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा बंदी आदेश आहे. असे असतांनाही, 1)प्रशांत पोपट गुजर रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद हा दि. 27.05.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील बाजारपेठ येथे तंबाखुनज्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला. तर, याच दिवशी 2)आशाबाई मस्के रा. कळंब या रंगीला चौक, कळंब येथील आपल्या दुकानात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळल्या. यावरुन वरील दोघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments