Header Ads

“रस्ता अपघात, पुरुष मयत.”


पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुरेश प्रल्हाद गायकवाड रा. बोरनदीवाडी, ता. तुळजापूर हे दि. 26.05.2020 रोजी 23.30 वा. सु. भाऊ- रामा गायकवाड वय 42 वर्षे यास मोटारसायकलवर घेउन जात होते. दरम्यान निष्काळजीपणे मो.सा. चालवल्याने ती अनियंत्रीत होउन मौजे बोरनदीवाडी शिवारात पुलाच्या कठड्यास धडकली. या अपघातात रामा गायकवाड हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या विजय गोगांणे रा. बोरनदीवाडी यांच्या फिर्यादीवरुन सुरेश प्रल्हाद गायकवाड यांच्याविरुध्द निष्काळजीपणे मृत्युस कारणीभुत झाल्याबद्दल भा.दं.वि. कलम-279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, ढोकी: भाऊसाहेब प्रल्हाद तनमोर रा. सारोळा (भिकार), ता. उस्मानाबाद हे दि. 06.05.2020 रोजी आपल्या राहत्या घरी होते. यावेळी भाऊबंद- अनिल प्रल्हाद तनमोर व संगिता तनमोर या दोघांनी तेथे येउन भाऊसाहेब तनमोर यांना घरा बाहेर बोलावून पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारहाण करुन कमरेचे हाड मोडले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भाऊसाहेब तनमोर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 26.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: बाळाप्पा घोडके रा. केसरजवळगा, ता. उमरगा हे दि. 24.05.2020 रोजी 10.30 वा. सु. आपल्या घरी होते. यावेळी भाऊबंद- अनिल घोडके, सुनिल घोडके, गजेंद्र घोडके, युवराज घोडके, बसवराज घोडके, सुर्यकांत घोडके, शिवराज घोडके या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून बाळाप्पा घोडके यांच्या घरात घुसले. बाळाप्पा यांच्यासह पत्नी- पार्वती, मुलगा- पृथ्वीराज यांना घरा बाहेर आनून काठीने मारहाण केली. तर बाळाप्पा व पृथ्वीराज या दोघांच्या हातावर कुऱ्हाड मारुन त्यांना जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाळाप्पा घोडके यांच्या प्रथम खबरेवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, परंडा: जिल्हा खनी कर्म अधिकारी यांनी कारवाईत जप्त केलेली 35 ब्रास वाळु (गौन खनिज) मौजे हिंगणगांव (बु.), ता. परंडा येथील शेत गट क्र. 184 मध्ये येमाई मंदीर जवळ साठा करुन ठेवली होती व त्यावर देखरेखीसाठी तलाठी- नितीन मोरे व पोलीस पाटील- वाकडे यांना नेमन्यात आले होते. दरम्यान दि. 04.01.2020 ते 07.01.2020 या काळात नमुद वाळु पैकी 28 ब्रास वाळू किं.अं. 48,000/-रु. ची अज्ञात चोरट्याने वाहनामध्ये भरुन चोरुन नेली आहे.  अशा मजकुराच्या तलाठी- नितीन मोरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.05.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments