Header Ads

लॉकडाऊन: आदेश झुगारुन अंत्यविधीस गर्दी जमवली, गुन्हा दाखलपोलीस ठाणे, आनंदनगर: लॉकडाऊन काळात दि. 24.05.2020 रोजी 11.00 वा. सु. उस्मानाबाद येथील डी.एड. कॉलेजच्या जवळ असलेल्या स्मशानभुमीत मच्छिंद्र कारकुन काळे रा. साठेनगर, उस्मानाबाद यांच्या अंत्यविधीसाठी 250 ते 300 व्यक्तींनी एकत्र जमून गर्दी केली. अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी कोरोना कोविड- 19 संसर्ग रोखन्यासाठी जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केली. यावरुन संबंधीत सर्व व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, 34 अन्वये गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.

लॉकडाऊन: वेळेचे उल्लंघन करुन भाजी विक्री, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): दादासाहेब पांडुरंग वनवे रा. उपळाई, ता. कळंब हे दि. 25.05.2020 रोजी सकाळी  06.30 वा. मौजे येडशी येथील साप्ताहीक बाजारात मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेशीत केलेल्या वेळेचे उल्लंघन करुन, नाका- तोंडास मास्क न बांधता भाजी विक्री करत असतांना आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाउन: दि. 24.5.2020 रोजी 60 पोलीस कारवायांत 17,700/-रु. दंड वसुल.
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 25 कारवायांत- 5,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 10 कारवायांत- 5,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 16 कारवायांत 3,200/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 9 कारवायांत 4,500/- रु. दंड प्राप्त झाला आहे.

1 comment

Unknown said...

Lockdown madhe tuition/ class jahirat,banner lavale jau shaktat ka?
Answer please