Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन आणि चोरीचा एक गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, उमरगा: रविंद्र दुधभाते, गणेश सोनटक्के दोघे रा. उमरगा यांनी दि. 23.05.2020 रोजी उमरगा येथे जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गावातीलच- संभाजी लिंबाजी अंबुलगे यांना शिवीगाळ करुन, लाकडी फळीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संभाजी अंबुलगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: भिम खंडाळकर, शरणू खंडाळकर, सुभाष खंडाळकर, बाळू खंडाळकर, पिंटू खंडाळकर, ओमकार खंडाळकर, आप्पू खंडाळकर सर्व रा. अचलेर, ता. लोहारा यांनी दि. 23.05.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे अचलेर येथे बेकायदेशीर जमाव जमवून सामाईक बंधारा भोडल्याचा राग मनात धरुन गावकरी- दत्ता जगन्नाथ कांबळे यांच्यासह नातेवाईकांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठी- कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्ता कांबळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तामलवाडी: तेजश्री धावणे रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर या दि. 24.05.2020 रोजी 07.00 वा. सु. त्यांच्या घरा समोर काम करत होत्या. यावेळी शेजारील भाऊबंद- सिताबाई धावणे, बाजीराव धावणे, गोविंद धावणे, माई आतकरे यांनी तेजश्री धावणे यांना त्‍यांच्या घरा समोर असलेला दगडांचा खिळगा काढण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच तेजश्री यांची सासु मारहाण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तेजश्री धावणे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): माधव भानुदास शिंदे रा. माणिक चौक, उस्मानाबाद यांच्या मौजे केकस्थळवाडी येथील शेतातील पत्रा शेड मधील 50 फुट वायर, 12 लोखंडी पत्रे, लाकडी दांडा व 4 शहाबादी फरश्या एकत्रीत किं.अं. 5,210/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने दि. 21.05.2020 रोजी 19.00 ते 23.00 वा. चे दरम्यान चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या माधव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 23.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments