लॉकडाऊन: सार्वजनिक ठिकाणी वावर, 2 गुन्हे दाखल.”


उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाऊन काळात सार्वजनिक ठिकानी फिरतांना तोंडास मास्क लाउन दोन व्यक्तींत सुरक्षीत अंतर ठेवण्याचे आदेश झाले आहेत. असे असतानाही मौजे खासगांव येथे सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, एकमेकांत सुरक्षीत अंतर न ठेवता विषाणुचा संसर्ग होउ शकेल असे निष्काळजीपणाचे कृत्य केलेले 1)सचिन लिमकर 2)दिपक लिमकर 3)अनिल पिंगळे 4)शहाजी शिंदे सर्व रा. खासगाव, ता. परंडा 5)फिरोज सिकलकर रा. परंडा. तर, याच प्रकारात मौजे हासेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता एकत्र जमलेले 6)संतोष पवार 7)बंकट साळुंके 8)लक्ष्मण कानडे 9)रंजीत लोमटे 10)रविंद्र गवळी 11)धोंडीराम लोमटे सर्व रा. हासेगाव, ता. कळंब या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 186, 188, 269, सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

 “जुगार अड्ड्यावर छापे.”
पोलीस ठाणे, येरमाळा: 1)नसीर मुलानी 2)किरण देशमुख 3)अनंत वेदपाठक 4)औदुंबर बारसकर चौघे रा. येरमाळा, ता. वाशी 5)अमराव जाधवर 6)बाळासाहेब महामुनी 7)दत्तात्रय जाधवर तीघे रा. रत्नापूर हे सर्व दि. 19.05.2020 रोजी येरमाळा येथील बार्शी रोवरील माउली हॉटेलच्या पाठीमागे तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्य, रोख रक्कम, सहा मोबाईल फोन असा एकुण 39,730/-रु. च्या मालासह पो.ठा. येरमाळा यांच्या पथकास आढळुन आले.
पोलीस ठाणे, आनंदनगर: 1)रत्नदीप पवार 2)मनोज पापडे 3)शिवाजी कराड 4)अविनाश शेरखाने 5)जोगेंदर राजपुत सर्व रा. उस्मानाबाद हे सर्व हे सर्व दि. 19.05.2020 रोजी वरुडा रोड, उस्मानाबाद येथील वैभव काकडे यांच्या घरा समोर तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्यासह रोख रक्कम 16,260/-रु. च्या मालासह पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळुन आले.


 “अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.

1) शैलेश चव्हाण रा. पाटील तांडा, ता. तुळजापूर हा दि. 19.05.2020 रोजी मौजे लोहगाव रोडवर एका मोटारसायलवर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एका मोटारसायकलवर वाहतुक करत असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळला. त्याच्या ताब्यातून 50 ली. गावठी दारु (किं.अं. 4,000/-रु.) व मो.सा. जप्त करण्यात आली आहे.
2) विजय तळेकर रा. पारगाव, ता. वाशी हा दि. 19.05.2020 रोजी मौजे परगाव ते हातोला रस्त्याच्या पुलाखाली दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 5 ली. गावठी दारु (किं.अं. 550/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळला.
यावरुन वरील व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


 “मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 263 कारवाया.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 19/05/2020 रोजी मोटार वाहन कायदा- विविध कलम- नियमांनुसार 263 कारवाया करुन त्यापोटी 54,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त केले आहे.

No comments