Header Ads

लॉकडाउन- बंदीकाळात दुकान उघडले, गुन्हा दाखलउस्मानाबाद -  अभिजीत कोकाटे व संजय मिसाळ दोघे रा. फकीरानगर, उस्मानाबाद यांनी दि. 22.05.2020 रोजी 13.30 वा. इंगळे गल्ली, उस्मानाबाद येथील दुकान विनापरवाना व बंदी आदेश झुगारुन उघडे ठेवले. अशा मजकुराच्या तलाठी- श्रीमती अर्चना कदम, यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरुन नमुद दोघांविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा नोंदवला आहे.

जुगार अड्ड्यावर छापे.”
पोलीस ठाणे, परंडा: महादेव भोसले, हबु भोसले, पोपट बोराडे, दत्तात्रय बोराडे सर्व रा. सावरगाव, ता. भुम हे सर्व दि. 21.05.2020 रोजी सावरगाव येथील हबु भोसले यांच्या शेतात जिरट जुगार खेळतांना जुगाराचे साहित्यासह रोख 11,100/-रु. च्या मालासह पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळुन आले.
तर आज दि. 22.05.2020 रोजी दादाहरी सलगर, आण्णा गाढवे, सतिष आकरे, रमेश शिंदे सर्व रा. देवंग्रा, ता. भुम हे मौजे शेकापुर शिवारातील पाझर तलावा जवळ जिरट जुगार खेळतांना जुगाराचे साहित्यासह रोख 1,050/-रु. च्या मालासह पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन नमुद सर्वांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. परंडा येथे नोंदवले आहेत.


 “अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.

1) माधुरी अरुण काळे रा. जुना बसडेपो, उस्मानाबाद या दि. 21.05.2020 रोजी जुना बसडेपो, उस्मानाबाद येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 30 ली. गावठी दारु (किं.अं. 1,800/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळल्या. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा नोंदवला आहे.

2) पो.ठा. ढोकी पोलीसांचे पथक दि.22.05.2020 रोजी गस्तीवर असतांना पेठ गल्ली, तेर येथे दोन मोटारसायकलवर 4 व्यक्ती संशयास्पद रित्या आढळल्या. त्यांना पोलीसांनी हटकले असता ते मोटारसायकल व त्यावरील एकुण 30 गावठी दारुच्या रबरी नळ्या (1,500/-रु.) जागेवर टाकून पळून गेले. सदर हिरोहोंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 0406 व होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 13 बीसी 5777 व त्यावरील गावठी दारु पोलीसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी 4 अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला असुन पोलीस मोटारसायकल मालकांचा शोध घेत आहेत.

चोरी.”
पोलीस ठाणे, लोहारा: प्रकाश  तुकाराम राठोड रा. लोहारा यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 21.05.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरात असलेल्या कपाटातील अंदाजे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या प्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 22.05.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments