उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार आणि चोरीचा एक गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, ढोकी: महादेव पांडुरंग चामे रा. बुकनवाडी, ता. उस्मानाबाद (सरपंच) हे दि. 20.05.2020 रोजी 12.00 वा. सु. बुकनवाडी पारधी पिढी येथे घरोघरी जाऊन सर्वे होते. दरम्यान महादेव चामे हे सचिन चंदर शिंदे यांच्या घरा समोर आले असता सचिन शिंदे यांनी महादेव चामे यांना सर्वे न करण्यासाठी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने महादेव चामे यांना शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव चामे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपीविरुध्द गुन्हा दि. 20.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: देविदास मनोहर गुरुखेले व मारुती गुरुखेले दोघे रा. कोरेगांववाडी, ता. उमरगा या दोघा पिता- पुत्राने दि. 19.05.2020 रोजी 15.30 वा. सु. मौजे कारेगाववाडी येथे गावातीलच- मुरलीधर बळीराम भोसले व त्यांच्या मुलास पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मुरलीधर भोसले यांच्या फिर्यादीवरुन नमुद पिता- पुत्रा विरुध्द गुन्हा दि. 20.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: जगदीश प्रकाश दणाने रा. नंदगाव, ता. तुळजापूर हे दि. 20.05.2020 रोजी 21.00 वा. सु. गावातील मंदीरासमोर बसले होते. यावेळी भाऊबंद- अदित्य चंद्रकांत दणाने, व्यंकटेश दणाने, चंद्रकांत दणाने, जनार्धन दणाने यांनी त्या ठिकाणी येउन पुर्वीचे भांडण उकरुन काढून जगदीश दणाने यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. यात अदित्य दणाने याने जगदीश दणाने यांच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. तसेच मारहाण सोडवण्यास आलेल्या जगदीश दणाने यांच्या नातेवाईकांनाही मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जगदीश दणाने यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 21.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: दि. 20.05.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे नाईकनगर (सु.) येथे योगेश माणिक राठोड व अन्य 27 व्यक्ती सर्व रा. नाईकनगर (सु.), ता. उमरगा यांचा गावातीच भाऊबंद- शिवाजी लक्ष्मण राठोड व अन्य 30 व्यक्ती यांच्याशी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवाजी लक्ष्मण राठोड यांच्या गटातील व्यक्तींनी योगेश राठोड यांच्या घरा समोरील वाहनावर दगड मारुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. मुरुम येथे दि. 21.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


चोरी.”

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): शंकर राजाराम गांधले रा. पिंपरी बेलदार, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची आतील बाजूची कडी अज्ञात चोरट्याने उघडून दि. 20.05.2020 रोजी मध्यरात्री घरातील कपाटात ठेवलेले सोने- चांदीचे दागिने 11,700/-रु. चे व रोख रक्कम 15,000/-रु. असा एकुण 26,700/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या शंकर गांधले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 21.05.2020 रोजी नोंदवला 

No comments