Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाणीचे पाच गुन्हे दाखल 


पोलीस ठाणे, वाशी: वसंत अंबादास चौधरी रा. तांदुळवाडी, ता. वाशी व त्यांच्या पत्नीसह दि. 30.04.2020 रोजी मौजे तांदुळवाडी येथील त्यांच्या शेत गट क्र. 66 मध्ये काम करत होते. यावेळी गावातीलच- मधुकांत शिवाजी चौधरी, पांडुरंग चौधरी, अजय चौधरी, अक्षय चौधरी, जयश्री चौधरी, भाग्यश्री चौधरी यांनी वसंत चौधरी काम करत असलेल्या ठिकाणी येउन शेतातील रस्त्याच्या वादावरुन वसंत चौधरी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. तसचे मधुकांत चौधरी यांनी वसंत चौधरी यांच्या गळ्यावर पायाने दाबले. भाग्यश्री हिने मधुकांत यांच्या चिथावणीवरुन बाटलीतील विषारी औषध वसंत चौधरी यांच्या तोंडात ओतले.
अशा मजकुराच्या वसंत चौधरी यांनी वाशी न्यायालयात दिलेल्या तक्रारीवरुन नमुद आरोपीतांविरुध्द पो.ठा. वाशी येथे गुन्हा दि. 20.05.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, बेंबळी: दि. 19.05.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे महाळंगी शिवारात शेत गट क्र. 102 मध्ये शंकर लिंबराज म्हाळंगकर, लिंबराज शंकर म्हाळंगकर दोघे रा. महाळंगी, ता. उस्मानाबाद यांचा गावातीच भाऊबंद- निरंजन बाळासाहेब म्हाळंगकर, निर्मलाबाई म्हाळंगकर व एक्सकॅव्हेटर चा चालक यांच्याशी सामाईक विहीरीवरुन पाईपलाईन करण्याच्या कारणावरुन वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठी- लोखंडी बादलीने मारहाण करुन जखमी केले.. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. बेंबळी येथे दि. 20.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


पोलीस ठाणे, तुळजापूर: आकाश गणेश म्हैत्रे रा. सारोळा, ता. तुळजापूर हे दि. 18.05.2020 रोजी मौजे सारोळा येथील त्यांच्या शेतात एक्सकॅव्हेटर यंत्राने सामाईक कट्टा साफ करत होते. यावेळी भाऊबंद- अरुण रंगनाथ म्हैत्रे, अनुसया म्हैत्रे, नितीन म्हैत्रे, शिवनंदा म्हैत्रे यांनी सामाईक कट्टा साफ करण्याच्या कारणावरुन आकाश म्हैत्रे यांच्यासह राम धनके व संतोष पवार यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच एक्सकॅव्हेटर यंत्रावर दगड मारुन काच फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या आकाश म्हैत्रे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 19.05.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, तुळजापूर: मारुती संदीपान शिंदे रा. वडगाव (लाख), ता. तुळजापूर यांना दि. 18.05.2020 रोजी मौजे वडगाव (लाख) शिवारात पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून गावातीलच- राहुल करंडे, रोहीत करंडे, श्रीमंत करंडे यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रोहीत करंडे याने बिअरची बाटली मारुती शिंदे यांच्या डोक्यात मारुज जखमी केले. अशा मजकुराच्या मारुती शिंदे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 19.05.2020 रोजी नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, उमरगा: मुरलीधर भोसले, पवान भोसले, महादेव भोसले तीघे रा. कोरेगाववाडी, ता. उमरगा व भगवान गरड रा. नारंगवाडी, ता. उमरगा यांनी दि. 19.05.2020 रोजी मौजे कारेगाववाडी शिवारात पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन कोरेगाववाडीतीलच- मारुती मनोहर गुरुखेले व त्यांचा मुलगा- गणेश या दोघांना शिवीगाळ करुन, लोखंडी चैन, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. मारुती गुरुखेले यांच्या भावाच्या इंडीका कारवर दगड मारुन कारचे आर्थिक नुकसान केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती गुरुखेले यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 19.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments