“सरकारी आदेश झुगारुन सार्वजनिक ठिकाणी वावर, 2 गुन्हे दाखल.”


पोलीस ठाणे, उमरगा: 1)जयदिप कटके 2)सिमा जयदिप कटके 3)अशोक जोगदंडकर 4)सविता अशोक जोगदंडकर 5)विजय कटकधोंड सर्व रा. गुंजोटी, ता. उमरगा व 6)फुलचंद रामा गायकवाड रा. कदेर, ता. उमरगा या सर्वांनी दि. 16.05.2020 ते 18.05.2020 या कालावधीत पोलीस नाकाबंदीला टाळून आडवाटेने प्रवास करत विनापरवाना जिल्हा प्रवेश करुन आपापल्या गावांत राहिले. यावरुन संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरील व्यक्तींविरुध्द दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ग्राहकांची गर्दी जमवली दोन दुकान चालकांवर गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, तुळजापूर: 1)मुकूंद धुरगूडे रा. मंगरुळ 2)जावेद शेख रा. बिजनवाडी, ता. तुळजापूर या दोघांनी दि. 19.05.2020 रोजी 12.00 वा. तुळजापूर येथील अनुक्रमे ‘गौरी मंथन कॉम्पुटर्स’ आणि ‘साई मल्टी सर्विसेस & झेरॉक्स’ या दुकानांसमोर ग्राहकांत सुरक्षीत अंतर न राखता त्यांची गर्दी निर्माण करुन व्यवसाय केला. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे सरकार पक्षा तर्फे 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

मारहाण.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): दि.17.05.2020 रोजी 21.00 ते 23.00 वा. चे दरम्यान उंबरे कोठा उस्मानाबाद येथे अजित हाजगुडे व अन्य 6 व्यक्ती सर्व रा. उंबरे कोठा, उस्मानाबाद यांचा गावकरी मसाजी नामदेव शेंडगे व अन्य 7 व्यक्ती यांच्याशी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच मसाजी शेंडगे यांच्या गटातील व्यक्तींनी बाळासाहेब हाजगुडे यांच्या घराच्या खिडकी, दरवाजावर दगड मारुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे दि. 18.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, परंडा: अरमान जामीर अन्सारी रा. पिठापुरी, ता. परंडा हे किशोर काळे रा. करमाळा, जि. सोलापूर यांच्या एक्सकॅव्हेटर यंत्रावर चालक म्हणुन कामावर होते. अरमान अन्सारी यांनी ते काम सोडून त्यांच्या पिठापुरी गावी आले असता किशोर काळे याने बापु काळे व अन्य 2 व्यक्तींच्या सहाय्याने दि. 17.05.2020 रोजी 23.00 वा. सु. मौजे पिठापुरी येथे येउन अरमान अन्सारी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी गज डोक्यात मारुन जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी अरमान अन्सारी यांना मो.सा. वर बसवून पिठापुरी शिवारात नेउन तेथेही मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरमान अन्सारी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 18.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments