Header Ads

तीन खाजगी बसमधुन अवैध प्रवासी वाहतूक, गुन्हा दाखल
उमरगा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने लॉकडाउन काळात दोन व्यक्तींत सुरक्षीत अंतर ठेवण्याचा आदेश आहे. असे असतांनाही दि. 16.05.2020 रोजी उमरगा चौरस्ता येथे बस चालक- मालक 1)अनिल बाबु शिंदे रा. वाशी, नवी मुंबई 2)प्रशांत सुभाष मगर रा. वाघोली, ता. उस्मानाबाद 3)राजकुमार चन्नाप्पा डोनी रा. मन्याकेळी, ता.बिदर 4)गौसमियॉ खासिमसाब लदाफ रा. ईस्लामबाद, गलबर्गा 5)तानाजी सायबु सुर्यवंशी रा. कासारशिरशी, ता. निलंगा हे सर्व त्यांच्या ताब्यातील दोन बस क्र. एन.एल. 01 बी 1266 मध्ये 33 प्रवासी व एन.एल. 01 बी 1783 मध्ये 33 प्रवासी विनापरवाना घेउन जात होते. तर 1)विनोद करडे 2)महम्मद बारभय्या दोघे रा. मुंबई हे दोघे एका मिनी बसमधुन 11 प्रवासी विनापरवाना वाहुन नेत असतांना दि.18.05.2020 रोजी पो.ठा. उमरगा यांच्या पथकास उमरगा शहरात आढळले.  यावरुन वरील तीन्ही बसशी संबंधीत चालक- मालक यांच्यावर भा.दं.वि. कलम-188, 269 सह, कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ग्राहकांची गर्दी जमवली दुकान चालकावर गुन्हा दाखल.”
तुळजापूर: प्रतापसिंग सतिश सरडे रा. मंगरुळ, ता. तुळजापूर यांनी दि. 18.05.2020 रोजी 12.05 वा. विश्वनाथ कॉर्नर, तुळजापूर येथील त्यांचे ‘साई कृषी सेवा केंद्र’ या दुकानासमोर ग्राहकांत सुरक्षीत अंतर न राखता त्यांची गर्दी निर्माण करुन व्यवसाय केला. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे गुन्हा दि. 18.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments