दोन रस्ते अपघात, एक मयत


 उस्मानाबाद (श.): सुनिल शंकर मनगिरे वय 50 वर्षे, रा. साईनगर, उस्मानाबाद हे दि. 24.04.2020 रोजी 09.00 वा. सु. मौजे वडगाव येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान शहनवाज जकीयोद्दीन इनामदार रा. येडशी, ता. उस्मानाबाद याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 3847 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून सुनिल मनगिरे यांच्या मो.सा. ला धडक दिली. यात सुनिल मनगिरे हे मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता मो.सा. चालक घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या अक्षय सुनिल मनगिरे यांच्या फिर्यादीवरुन नमुद मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 16.05.2020 रोजी नोंदवला आहे.

नळदुर्ग: धनराज नरसु मेटे रा. जवळगा मेसाई, ता. तुळजापूर हे दि. 18.03.2020 रोजी 16.00 वा. सु.मौजे चिकुंद्रा शिवारातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 0522 ही चालवत जात होते. दरम्यान मो.सा. क्र. एम.एच. 25 व्ही 0674 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून धनराज मेटे चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला धडक दिली. या अपघातात धनराज मेटे हे जखमी झाले असुन त्यांच्या मो.सा. चे आर्थिक नुकसान झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता नमुद मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या धनराज मेटे यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतावर गुन्हा दि. 16.05.2020 रोजी नोंदवला आहे.


मारहाण.”
 ढोकी: ईर्षाद अब्बासअली काझी रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांना दि. 12.05.2020 रोजी 09.30 वा. मौजे ढोकी येथे सुनिल जनार्धन लंगडे व अन्य 7 व्यक्ती यांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ईर्षाद काझी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 16.05.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.): चंद्रकांत गोपीनाथ जाधव रा. अंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद यांना व त्यांचा मुलगा- विशाल या दोघांना दि. 13.05.2020 रोजी 07.30 वा. सु. त्यांच्या घरा समोर पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन बेकायदेशी जमाव जमवून नातलग- सतिश राठोड, अनिल राठोड, संतोष राठोड, अजय राठोड, तुषार राठोड, अर्चना राठोड, छाया राठोड यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या चंद्रकांत जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 16.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments