उस्मानाबाद जिल्हा : चोरीचे चार आणि हाणामारीचे तीन गुन्हे दाखलचोरी.”
पोलीस ठाणे, भुम: भुम येथील न्यायालय ईमारतीच्या आवारातील सुमारे 60 सें.मी. उंचीची व 2 सें.मी. व्यासाचा बुंधा असलेली दोन आंब्याची झाडे (किं.अं. 1,000/-र.) अज्ञात चोरट्याने दि. 14.05.2020 रोजी रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजू मेंढारकर, सहायक अधीक्षक यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 16.05.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: कृष्णा महादेव डोंगरे रा. मंगरुळ, ता. तुळजापूर हा महावितरण कंपनीच्या भातंब्री घाटातील विज वाहिनी मनोऱ्याच्या लोखंडी पट्ट्या (किं.अं. 5,000/-रु.) दि. 15.05.2020 रोजी रात्री 21.30 वा. चोरुन मोटारसायकलवर वाहुन नेत असतांना भातंब्रीचे पोलीस पाटील- महाबळेश्वर बाळु कांबळे यांना आढळला. यावरुन पोलीस पाटील  कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपीविरुध्द गुन्हा दि. 16.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: सुभाष प्रभाकर शेट्टी रा. समर्थ नगर, उस्मानाबाद यांच्या उस्मानाबाद, बसस्थानक जवळ असलेल्या ‘न्यु प्रदिप बिअर बार’ मधील विदेशी दारु व बिअर किं.अं 2,08,640/- रु.
ही अज्ञात चोरट्याने दि. 14.05.2020 रोजी 21.30 वा. ते दि. 15.05.2020 रोजी 03.30 वा. चे दरम्यान कुलूप तोडून चोरुन नेली. तर बारच्या पाठीमागील भवरलाल चुन्नीलाल माळी यांच्या ‘जय अंबे जनरल स्टोअर्स’ दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून दुकानातील कॉस्मेटीक साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 1,81,499/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सुभाष शेट्टी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 15.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श): गणेश शिवाजी मोरे रा. बालाजी नगर, उस्मानाबाद यांच्या शेकापुर रोड, ओमनगर, उस्मानाबाद येथील ‘मोरे दुध डेअरी & बेकर्स’ चे आणि कल्पना प्रविण खळतकर यांच्या ‘धन्वंतरी मेडीकल & जनरल स्टोअर्स’ या दोन दुकानांचे शटर दि. 14.05.2020 रोजी 22.00 ते 15.05.2020 रोजी 06.00 वा. चे दरम्यान अज्ञात चोरट्याने उचकटून बेकरी मधील- ईनव्हर्टर, चॉकलेट बॉक्स इत्यादी व धन्वंतरी मेडीकल मधील- झंडू बाम, चॉकलेट बरणी व रोख रक्कम 806/-रु. असा दोन्ही दुकानातील एकत्रीत 9,566/-रु. चाल माल चोरुन नेला. तसेच, संकेत जाधव यांच्या पानटपरीचे शटर उचकटुन चोरीचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या गणेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 15.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, ढोकी: सुनिल जनार्धन लंगडे रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे तेरणा साखर कारखान्यावर पहारा देत होते. त्यावेळी गावातीलच- इरशाद अब्बासअली काझी हा त्या ठिकाणाहून मोटारसायकल चालवत जात असतांना सुनिल लंगडे यांनी त्यास हाताने इशारा केला परंतु तो थांबला नाही. दि. 12.05.2020 रोजी सुनिल लंगडे यांनी इरशाद काझी यास न थांबन्याचे कारण विचारले असता त्यावर चिडुन इरशाद याने बेकायदेशीर जमाव जमवून इरफान काझी, बुऱ्हान काझी, आबराल काझी, जकी काझी, अन्वर काझी, मोसीन शेख, सुलतान काझी व असहद काणी सर्व रा. ढोकी यांच्या सहाय्याने सुनिल यांना लाथाबुक्क्यांनी, गज- काठीने मारहाण करुन जखमी केले. सुनिल यांचा भाऊ- गुलचंद हे भांडणे सोडवण्यास आले असता त्यांनाही काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या सुनिल लंगडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: उध्दव अनंत आडतरे रा. देवळाली, ता. भुम हे दि. 13.05.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर थांबले होते. यावेळी गावातीलच- संजय नामदेव लष्कर, लक्ष्मण लष्कर, रोहित लष्कर, अनिल लष्कर यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन उध्दव आडतरे व भाऊ- बच्चु आडतरे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अध्दव आडतरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.05.2020रोजी नोंदवला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सतीश शिवाजी राठोड रा. अंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद यांना व त्यांचा पुतण्या- संताष राठोड या दोघांना दि. 13.05.2020 रोजी 07.30 वा. सु. त्यांच्या घरा समोर पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन बेकायदेशी जमाव जमवून नातलग- विशाल जाधव, महेश जाधव, चंद्रकांत जाधव, संजय चव्हाण, चरणसींग राठोड, उमेश राठोड, ऋतुजा जाधव यांनी शिवीगाळ करुन, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सतीश राठोड यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments