उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल तर एका ठिकाणी सुनेचा छळ मारहाण.”

पोलीस ठाणे, नळदुर्ग: सिंधु गोरख शिंदे रा. येवती, ता. तुळजापूर यांच्यासह त्यांचे पती- गोरख शिंदे, मुलगा- धन्यकुमार, पुतण्या- महेश हे दि. 14.05.2020 रोजी मौजे येवती येथील त्यांच्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- श्रीकांत दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, उध्दव शिंदे व अन्य 7 व्यक्ती यांनी बेकायदेशी जमाव जमवून शेताच्या मशागतीच्या कारणावरुन सिंधु शिंदे व त्यांच्या कुटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सिंधु शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: महेश दिपक चव्हाण रा. किणी, ता. उस्मानाबाद हे दि. 13.05.2020 रोजी 17.30 वा. सु. त्यांच्या शेतातील सामाईक बांधावरुन पायी चालत जात होते. यावेळी शेतशेजारी- विशाल रमेश घोडके यांनी रहदारीच्या कारणावरुन महेश यांना शिवीगाह करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असतांना महेश यांचा भाऊ- गणेश चव्हाण हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनापण विशाल घोडके, गणेश दत्तात्रय घोडके, धनंजय दत्तात्रय घोडके व दत्तात्रय घोडके या चौघा पिता- पुत्रांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: संजय नामदेव लष्कर रा. देवळाली, ता. भुम हे त्यांचा पुतण्या- रोहित यास मारहाण केल्याचा जाब दि. 13.05.2020 रोजी 20.30 वा. सु. गावातीच- बबलु उध्दव आडतरे, सतीश पांडुरंग आडतरे, उध्दव आनंत आडतरे, पांडुरंग आनंत आडतरे यांना त्यांच्या घरी जाउुन विचारला असता त्या चौघांनी संजय लष्कर व रोहित यास शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संजय लष्कर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: जगन्नाथ कांबळे, गौतम कांबळे, महेश कांबळे तीघे रा. अणदुर, ता. तुळजापूर हे तीघे पिता- पुत्र दि. 13.05.2020 रोजी 18.30 वा. सु. त्यांच्या घरा शेजारील- नारायण बसवंत सुतार यांच्या घरालगत काठाड्या लावत होते. यावेळी नारायण सुतार यांनी ेकाठाड्या लावण्याचा जाब त्यांना विचारला असता त्या तिघा पिता- पुत्रांनी नारायण सुतार व पत्नी- महादेवी, मुलगा- शैलेश यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नारायण सुतार यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवला आहे.


सुनेचा छळ.
पोलीस ठाणे, लोहारा: 1)संजीव रामभाउ गायकवाड (पती) 2)निलाबाई गायकवाड (सासु) 3)राहुल गायकवाड (दीर) 4)शुभांगी गायकवाड (जाऊ) सर्व रा. सास्तुर, ता. लोहारा यांनी सुन पल्लवी हिने माहेरहुन पैसे आणन्याकरीता सन 2005 साला पासून सासरी- सास्तुर येथे तीचा अनेकदा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच माहेरहुन पैसे न आनल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पल्लवी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments