Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन तर चोरीचा एक गुन्हा दाखल मारहाण.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): दि.09.05.2020 रोजी 19.30 ते 20.30 वा. चे दरम्यान मौजे भानसगाव, ता. उस्मानाबाद येथे शरद सुग्रीव कदम व अन्य 9 व्यक्ती सर्व रा. भानसगाव यांचा पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातीलच- प्रदिप दिलीप मगर व अन्य 11 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने, गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे दि. 13.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, आंबी: दि.13.05.2020 रोजी 08.00 वा. सु. दरम्यान मौजे जेजला, ता. भुम येथे दगडु शेषराव कसाब व अन्य 15 व्यक्ती सर्व रा. जेजला यांचा शेतजमीन वाटनीच्या कारणावरुन भाऊबंद- अशोक नवनाथ कसाब व अन्य 6 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने, मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. आंबी येथे दि. 13.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): कुसूम चंद्रकांत जाधव रा. अंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद या कुटूंबीयांसह दि. 11.05.2020 रोजी 23.55 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी होत्या. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातील नातेवाईक- अनिल राठोड, सतीश राठोड, संतोष राठोड, अक्षय राठोड, दिलीप राठोड, अर्चना राठोड, रमाबाई राठोड, छाया राठोड यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कुसूम जाधव यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कूटूंबीयांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुसूम यांच्या घरातील 100 ग्रॅम सोन्याचे दागीने व रोख रक्कम 20,000/- रु. असा एकुण 2,70,000/- रु. चा माल धक्काबुक्की करुन घेतला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कुसूम जाधव यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 13.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, तामलवाडी: किर्ती धनशाम जमदाडे रा. काटी, ता. तुळजापूर यांचे मौजे काटी येथील शेत गट क्र. 242 मध्ये देशी दारु दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दि. 13.05.2020 रोजी मध्यरात्री दुकानातील देशी दारुच्या 1,002 बाटल्या व बिअरच्या 12 बाटल्या एकुण किं.अं. 47,462/- रु च्या व सीसीटीव्ही चा मेमरी बॉक्स (डीव्हीआर) चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या किर्ती जमदाडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 14.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर छापा.”
पोलीस ठाणे, कळंब: 1)ज्ञानेश्वर शेंडगे 2)संजय मोरे 3)अरुण तावडे तीघे रा. इंदीरानगर, कळंब 4)जलील शेख 5)किरण वाघमारे 6)तुपसमुद्रे तीघे रा. डिकसळ हे सर्व दि. 13.05.2020 रोजी मौजे भाटसांगवी येथील महादेव कोरडे यांच्या शेतात तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्य, रोख रक्कम, तीन मोबाईल फोन व तीन मोटारसायकल असा एकुण 1,24,360/-रु. च्या मालासह पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळुन आले.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): 1)नागेश झाडपिडे 2)सोमनाथ चपणे दोघे रा. उस्मानाबाद हे दोघे दि. 13.05.2020 रोजी तुळजाई हॉटेल समोरील मार्केट यार्ड येथे कल्याण नाईट मटका जुगार खेळत असतांना त्यांच्या ताब्यात जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,320/- रु. च्या मालासह पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळुन आले.

No comments