“क्वारंटाईन इसमांचा सार्वजनिक वावर, 6 गुन्हे दाखल.”


उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश बंदी असतांनाही सोलापूर- पुणे- औरंगाबाद येथून आडवाटेने प्रवास करत पोलीस नाकाबंदीस टाळून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केलेले. 1)प्रशांत शाम जाधव रा. वागदरी, ता. तुळजापूर 2)कोमल दत्तात्रय धुमाळ 3)महादेव राजेंद्र धुमाळ दोघे रा. चुंगी, ता. उक्कलकोट 4)गोविंद विठ्ठल चव्हाण 5)अश्विनी गोविंद चव्हाण दोघे रा. नागुर तांडा, ता. अक्कलकोट 6)ज्योतीबा दत्तात्रय तौर 7)शिवाजी बालाजी तौर दोघे रा. औरंगाबाद या सर्वांना त्यांच्या गावी प्रशासनाने होम क्वारंटाईन केलेले होते. क्वारंटाईन असतांनाही त्यांनी दि. 11.05.2020 रोजी नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरुन निष्काळजीपणाचे कृत्य केले. तसेच, 8)म्हाळाप्पा अंकुश हाबळे रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातून आडवाटेने प्रवास करत मौजे धनगरवाडी येथे येउन नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणाची कृती केली.
तर, आज दि. 12.05.2020 रोजी हैद्राबाद- सोलापूर- पुणे येथून आडवाटेने, छुप्या मार्गाने प्रवास करुन उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करुन नाका- तोंडास मास्क न लावता आपापल्या गावी सार्वजनिक ठिकाणी फिरुन निष्काळजीपणाची कृती करणारे 1)कृष्णात झांबरे रा. चिवरी 2)भिमराव घोडके 3)सुवर्णा घोडके 4)योगेश वाघमारे 5)अमोल वाघमारे 6)सखुबाई चुंगे 7)मोहन चुंगे सर्व रा. सलगरा (गड्डी), ता. तुळजापूर यावरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 6 गुन्हे दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन: ग्राहकांची गर्दी जमवली, 2 गुन्हे दाखल.
पोलीस ठाणे, तुळजापूर: 1)भैरवनाथ बाळासाहेब घाटशिळे रा. सिंदफळ 2)राजकुमार हालकुडे रा. मंगरुळ, ता. तुळजापूर या दोघांनी दि. 12.05.2020 रोजी तुळजापूर येथे अनुक्रमे ‘मोबाईल शॉपी’ व ‘स्वामी समर्थ बँकींग सेवा’ या आपापल्या ताब्यातील दुकाना समोरील ग्राहकांना कोरोना संसर्ग होउ नये म्हणुन एकमेकांपासून सुरक्षीत अंतरावर उभे न करता ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय केला. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments