डंपर निष्काळजीपणे चालवल्याने महिलेचा मृत्यु


पोलीस ठाणे, ढोकी: हरिश्चंद्र गोविंद मगर रा. वाघोली (वरुडा), ता. उस्मानाबाद यांनी दि. 10.05.2020 रोजी 13.30 वा. सु. पळसप ते मुरुड रोडलगत राजेंद्र तुपे यांच्या शेताजवळील खडी केंद्रावर खडीने भरलेला डंपर क्र. एम.एच. 04 एफके 3214 हा निष्काळजीपणे पाठीमागे घेतल्याने डंपरच्या मागे काम करत असलेल्या पदमीणी भूजंग जाधव वय 37 वर्षे, रा. वडगांव (सि.) ता. उस्मानाबाद यांच्या अंगावर डंपरचे चाक जाउन त्या जागीच मयत झाल्या. अशा मजकुराच्या तुकाराम भागवत जाधव रा. वडगांव (सि.) यांच्या फिर्यादीवरुन वरील डंपर चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 12.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: पंचप्पा हावळप्पा चिनगुंडे  रा. नंदगांव, ता. तुळजापूर हे दि. 10.05.2020 रोजी 13.00 वा. सु. मौजे नंदगांव येथील त्यांच्या शेत बांधावरील झाड तोडत होते. त्यावरुन भाऊबंद- रामचंद्र चिनगुंडे, लक्ष्मण चिनगुंडे यांनी पंचप्पा चिनगुंडे व त्यांचे वडील- हवळप्पा चिनगुंडे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच झाड तोडल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पंचप्पा चिनगुंडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 11.05.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आंबी: हरीश्चंद्र लक्ष्मण सुर्यवंशी, राहुल सुर्यवंशी, अतुल सुर्यवंशी सर्व रा. बंगाळवाडी, ता. परंडा यांनी दि. 08.05.2020 रोजी मौजे बंगाळवाडी शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- अजिनाथ वसुदेव सुर्यवंशी व त्यांचा मुलगा- गणेश या दोघांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजिनाथ सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 11.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


जुगार अड्ड्यावर छापा.”

पोलीस ठाणे, परंडा: 1)कृष्णा मिसाळ 2)सुधिर मिरगणे 3)रविंद्र मिरगणे 4)अण्णा मिसाठ चौघे रा. सावदरवाडी, ता. परंडा 5)सतिश प्रतापे 6)पोपट गोरे दोघे रा. अंतरगांव 7)तुकाराम सातपुते रा. खासगांव हे सर्व दि. 11.05.2020 रोजी मौजे सावदरवाडी येथील मोहन मिरगणे यांच्या शेतात तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्य, रोख रक्कम 1,870/- रु. च्या मालासह पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. परंडा येथे गुन्हा दि. 11.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments