Header Ads

लॉकडाउन: ग्राहकांची गर्दी जमवली, 2 गुन्हे दाखल


उस्मानाबाद  मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन 1)संदीप पवनकुमार अग्रवाल 2)सचिन हरीभाऊ कानडे दोघे रा. तुळजापूर यांनी दि. 11.05.2020 रोजी 13.00 वा. सु. तुळजापूर येथे आपापल्या ताब्यातील दुकाना समोरील ग्राहकांना कोरोना संसर्ग होउ नये म्हणुन एकमेकांपासून सुरक्षीत अंतरावर उभे करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता त्यांनी ग्राहकांची गर्दी जमवून व्यवसाय केला.  यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 11.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 3 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन असतांनाही दि.10.05.2020 रोजी जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर येणाऱ्यांची पो.ठा. कळंब- यांनी 3 वाहने ताब्यात घेतली आहेत.

मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 165 कारवाया.
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 10/05/2020 रोजी मोटार वाहन कायदा- विविध कलम- नियमांनुसार 165 कारवाया करुन त्यापोटी 33,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त केले आहे.

No comments