“पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.”


पोलीस ठाणे, आंबी: साकत, ता. परंडा येथील एका शेतात सामाईक बांधावरुन वाद निर्माण होत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे आंबी येथील पोहेकॉ- गजानन मुळे यांनी त्या ठिकाणी जाउन वाद निराकरणाचा प्रयत्न केला. यावर गहिनीनाथ हुके, अंबऋषी हुके, बळीराम हुके तीघे रा. साकत हे  गजानन मुळे यांच्या अंगावर धाउन गेले तसेच त्यांना अरेरावीची, उद्दामपनाची भाषा वापरली. अशा प्रकारे त्यांनी पोलीसाने (लोकसेवकाने) त्याचे शासकीय कर्तव्य करु नये म्हणुन जाणीव पुर्वक अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या गजानन मुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तीघांविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 17 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन असतांनाही दि.09.05.2020 रोजी जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन वाहनासह रस्त्यावर येणाऱ्यांची परंडा पो.ठा.- 4, कळंब- 13, अशी एकुण 17 वाहने ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन: आदेश डावलून दुकान चालु ठेवले, 2 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा: मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन भारत नामदेव लोकरे रा. दसमेगाव, ता. वाशी यांनी दि. 09.05.2020 रोजी 12.00 वा. सु. मौजे दसमेगाव येथे किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवले. तर, दि. 10.05.2020 रोजी ताजमहल चित्रमंदीर, उस्मानाबाद येथे अल्ताफ शेख याने मासे विक्री दुकान चालू ठेवले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 271 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments