उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखल पोलीस ठाणे, ढोकी: राजेंद्र लक्ष्मण कोकरे रा. तेर पेठ, ता. उस्मानाबाद यांच्यासह पत्नी- आशा कोकरे या दोघांना दि. 06.05.2020 रोजी 12.15 वा. सु. त्यांच्या घरा समोर पाणी भरण्याच्या कारणावरुन कॉलनीतील- काका टकले, बापु टकले यांनी शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली. तसेच राजेंद्र कोकरे यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राजेंद्र कोकरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: तुकाराम दत्तात्रय कोरे रा. सुंभा, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे भिंतीला चिकटुन शेजारील- लोकेश सरवदे, राहुल सरवदे यांनी घरावरील पत्रे टाकले होते. त्याबाबत त्यांना दि. 01.05.2020 रोजी 08.00 विचारण्यासाठी गेले असता त्या दोघांनी तुकाराम कोरे यांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली व काठी डोक्यात मारुन जखमी केले. भांडणे सोडवण्यास आलेलेल्या तुकाराम यांच्या आईस देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तुकाराम कोरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: सुनिल बाळासाहेब पाटील रा. सिरसाव, ता. परंडा हे दि. 23.04.2020 रोजी स्वत:च्या शेतात काम करत होते. यावेळी शेतातील तारा वर करण्याच्या वादावरुन गावातीलच- बाबु बोबडे, तानाजी बोबडे, प्रदीप बोबडे, धनाजी बोबडे यांनी सुनिल पाटील यांना काठी, विटांनी मारहाण करुन जखमी केले. यात सुनिल यांचा उजवा हात मोडला. अशा मजकुराच्या सुनिल पाटील यांनी उपचार घेउन झाल्यावर दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, येरमाळा: रविराज आत्माराम डोके रा. सापनाई, ता. कळंब हे दि. 04.05.2020 रोजी आपल्या शेतात वडील- आत्माराम यांच्यासमवेत काम करत होते. यावेळी शेतबांधाच्या कारणावरुन भाऊबंद- बाबा डोके, धनराज डोके, स्वामी डोके यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रविराज डोके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: सिद्राम वाघमोडे रा. एकुरगा, ता. उमरगा यांच्या शेतबांधावरचे लिंबाचे झाड तोडल्याचा जाब त्यांनी दि. 06.05.2020 रोजी गावातील- रामेश्वर बोंडगे, रवि बोंडगे, निखील बोंडगे यांना विचारला. यावर चिडून जाउन त्या तीघांनी सिद्राम वाघमोडे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सिद्राम वाघमोडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments