उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या पाच तर चोरीच्या दोन घटना 


पोलीस ठाणे, तुळजापूर: उर्मिला प्रविण काळदाते रा. हाडको, तुळजापूर या दि. 09.05.2020 रोजी 09.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी होत्या. यावेळी मकरंद जितेंद्र नवले, अविनाश क्षिरसागर, अमरजा क्षिरसागर, शिला नवले सर्व रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर यांनी त्यांच्याविरुध्द दाखल केलेली केस काढून घेण्याच्या कारणावरुन उर्मिला काळदाते यांना त्यांच्या घरात जावून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच केस मागे न घेतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अर्मिला काळदाते यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 09.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: प्रकाश भागवत गोरे, प्रविण पांडुरंग शेटे, किरण भाउसाहेब पाटील, मधुकर रावसाहेब तांबे, दिनकर भागवत गोरे सर्व रा. देवळाजी, ता. भुम यांच्या दारुअड्ड्याची माहिती पोलीसांना दिल्याचा राग मनात धरुन गावातीलच- बाबासाहेब गणपती गिलबीले यांना दि. 09.05.2020 रोजी 02.30 वा. सु. मौजे देवळाली शेत शिवारात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ केली. तसेच चाकूने खांद्यावर वार करुन, दगडाने मारहाण केली. भांडाणे सोडवण्यास आलेल्या साजीद सज्जाक शेख, लक्ष्मण भारत जाधव यांना देखील शिवीगाळ करुन, चाकुने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाबासाहेब गिलबीले यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 09.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: कमळाबाई खुबा राठोड रा. ज्योती तांडा, आलुर, ता. उमरगा यांनी त्यांच्या गावातील- बाबु पांडु राठोड यांच्या भुखंडावर दगड टाकले होते. याचा राग मनात धरुन बाबु राठोड व त्यांची दोन मुलगा- सुनील व मनोज या तीघा पिता- पुत्रांनी दि. 09.05.2020 रोजी 11.30 वा. सु. ज्योती तांडा, आलुर येथे कमळाबाई राठोड व त्यांचा मुलगा- चंदु राठोड यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, फायबरच्या खुर्चीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कमळाबाई राठोड यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 09.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: दि.09.05.2020 रोजी 14.00 वा. सु. मोतीझरा तांडा, तुळजापूर येथे किरण धनंजय कदम रा. मोतीझरा तांडा यांचा जुन्या भांडणाच्या कारणावरुन निखील बालाजी माने व अन्य 2 स्त्रीया तीघे रा. मोतीझरा तांडा यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, चाकुने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. तुळजापूर येथे दि. 09.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, वाशी: शारदा पाटील रा. गोलेगांव, ता. वाशी या दि. 10.05.2020 रोजी अंगन झाडत असतांना भाऊबंद- प्रदीप पाटील, आशीष पाटील या दोघांनी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन शारदा पाटील यांना काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात शारदा यांचा एक दात पडला. अशा मजकुराच्या शारदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, उमरगा: शंकर भास्कर बोरुळकर रा. बालाजी नगर, उमरगा यांच्या राहत्या घरात दि. 17.04.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घुसून शंकर बोरुळकर यांनी उशाला ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल फोन किं.अं. 10,000/- रु. चा चोरून नेला. अशा मजकुराच्या शंकर बोरुळकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 09.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: खय्युम ईसमाईल पठाण रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी दि. 25.02.2020 रोजी 09.00 वा. सु. मौजे सिंदफळ शिवारातील चंद्रलोक धाब्या समोर रस्त्यालगत त्यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 0308 ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या खय्युम पठाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments