Header Ads

“दोन रस्ते अपघात, 1 तरुण मयत.”


पोलीस ठाणे, तुळजापूर: गणेश गौतम शिंदे वय 16 वर्षे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर हा दि. 04.05.2020 रोजी 16.50 वा. सु. सिंदफळ शिवारात एन.एच. 65 वर पायी चालत जात होता. दरम्यान कोंडाजी अल्लाउद्दीन शेख रा. वाघोली, ता. उस्मानाबाद याने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एडी 0227 हा निष्काळजीपणे, रोडच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवून गणेश शिंदे यास धडक दिली. या अपघातात गणेश शिंदे हा गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाला आहे.
अशा मजकुराच्या गौतम रघुनाथ शिंदे (मयताचे पिता) यांच्या फिर्यादीवरुन नमुद ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दि. 23.05.2020 रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): तात्या देविदास चव्हाण रा. खाजानगर, उस्मानाबाद हे दि. 19.05.2020 रोजी 17.00 वा. सु. सांजा चौक, उस्मानाबाद येथे पायी चालत जात होते. दरम्यान मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 5588 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून तात्या चव्हाण यांना धडक दिली. या अपघातात तात्या चव्हाण यांच्या डोक्यास मार लागून पाय मोडला आहे.
अशा मजकुराच्या तात्या चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद मो.सा.च्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दि. 23.05.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments