Header Ads

6 गुन्ह्यांतील 8 फरारी आरोपी अटकेतउस्मानाबाद -  पोलीस तपासावर असलेले तसेच  न्यायप्रविष्ट गुन्ह्यांतील आरोपी पोलीसांना गुंगारा देउन लपत असतात. काही आरोपी न्यायालयातून जामीनावर सुटल्यावर फरार होतात. अशा आरोपींना पकडण्यासाठी  पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन,. अपर पोलीस अधीक्षक . संदीप पालवे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद पोलीस दलातर्फे विशेष मोहिम उघडण्यात आली आहे. त्यास अनुसरून

पो.ठा. वाशी गु.र.क्र. 11/2009 मधील फरार आरोपी- राजेंद्र बाप्पा पवार रा. वाकडी यास तर,पो.ठा. येरमाळा गु.र.क्र. 143/2019 मधील पाहिजे आरोपी- तानाजी बाबुशा काळे रा. तेरखेडा, तर पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 62/2018, 314/2019, 184/2019 मधील पाहिजे आरोपी अनुक्रमे- रवि लाला शिंदे रा.पळसप, अर्जुन संजय पवार उर्फ सोन्या रा. उस्मानाबाद, रवि राजेंद्र पवार रा. पळसप, बाप्पा परशु पवार, सिध्दु वसंत काळे दोघे रा. उस्मानाबाद, तरपो.ठा. नळदुर्ग गु.र.क्र. 02/2018 मधील पाहिजे आरोपी निशांत सहदेव कांबळे रा. नळदुर्ग या 8 आरोपींना स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहुन दि. 09.05.2020 ते 11.05.2020 या काळात ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोनि  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि  पांडुरंग माने, . आण्णाराव खोडेवाड, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, किसन जगताप, रोकडे, प्रमोद थोरात, धनंजय कवडे, पोना- अमोल चव्हाण, शेळके, हुसेन सय्यद, कावरे, समाधान वाघमारे, महेश घुगे पोकॉ- अविनाश मारलापल्ले, पांडुरंग सावंत, लाव्हरेपाटील, आरसेवाड, सर्जे यांच्या पथकाने केली आहे.

No comments