उस्मानाबाद जिल्ह्यात काही मार्गावर बस धावणारउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, भूम आणि परंडा आगारातून काही मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या  बस धावणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी आदेश काढला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ११ मे रोजी एस. टी. बस सेवा सुरु करण्यात आली होती, परंतु परंडा येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आता  उमरगा, भूम आणि परंडा आगारातून काही मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या  बस धावणार आहेत.

उमरगा आगार :- 1) उमरगा ते लोहारा बेंबळी  ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 7.30, 9.00, 10.00, दुपारी 1.00 , 2.00, 3.00 , 4.00 अशी राहील.            2) उमरगा ते लोहरा सास्तूर नारंगवाडी ही बस सुटण्याची वेळ  सकाळी 7.00, 9.30, दुपारी 2.00 , सांय 5.30 अशी राहील.  3) उमरगा ते माकणी दाळींब ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.45, 10.15, दुपारी 2.00, सांय. 5.00 अशी राहील. 4) उमरगा ते मुरुम कंटेकुर ही बस सुटण्याची  वेळ  सकाळी 7.00, 8.00, 10.30, 11.30, दुपारी 1.00, 2.00, सांय 5.00, 6.00 अशी राहील. 5) उमरगा ते डिग्गी ही बस सुटण्याची वेळ  सकाळी 7.00, 8.30, 10.00, 11.30, दुपारी 1.00 , 2.30, 4.00, सांय 5.30 अशी राहील. 6) उरमगा ते नळदुर्ग ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 9.00, 11.00, दुपारी 1.00, 3.00, सांय. 5.00 अशी राहील.  

          भूम आगार :- 1) भूम ते येडशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 8.00, 10.00, 11.00, दुपारी 1.15, 2.15, 4.15 , सांय 5.15 अशी राहील. 2) भूम ते वाशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 8.15, 11.15, दुपारी 1.30, 3.15, सांय 6.15 अशी राहील. 3) भूम ते ईट ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 8.10 , 9.50 , 11.30 , दुपारी 1.30, 3.10 , 4.50 , सांय. 6.30 अशी राहील. 4) भूम ते पाथ्रुड ही बस सुटण्याची  वेळ सकाळी 10.15, 11.45, दुपारी 1.30, सांय. 6.00 अशी राहील.           5) भूम ते तांदुळवाडी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, दुपारी 3.00 अशी राहील.  6) येरमाळा ते वाशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.30, 11.00, दुपारी 12.45, 2.30, 4.00 अशी राहील.  7) भूम ते देवळाली ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.30, सांय. 6.30 अशी
राहील. 8) भूम ते येरमाळा ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 11.45, दुपारी 2.30 अशी राहील.

       परंडा आगार :- 1) परंडा ते वारदवाडी भूम ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 10.00, दुपारी 1.00, 4.00 अशी राहील. 2)  परंडा ते आनाळा भूम ही बस सुटण्याची  वेळ सकाळी 7.30, सांय. 5.00 अशी राहील. 3) परंडा ते पाथ्रुड ही बस सुटण्याची वेळ सकाळी 10.45, दुपारी 2.00 अशी राहील. 4) परंडा ते डोणजा तांदुळवाडी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.00, सांय. 5.30 अशी राहील. 5) परंडा ते आनाळा तांदुळवाडी ही बस सुटण्याची  वेळ  सकाळी 11.00, दुपारी 2.30 अशी राहील, असे विभाग नियंत्रक,  राज्य परिवहन, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अटी व शर्तींच्या अधीन राहून  परवानगी
      
1. उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब या तीन नगर परिषद क्षेत्रात असणाऱ्या बस स्थानकांमध्ये बस वाहतूक करण्यास परवानगी असणार नाही.
          2. उस्मानाबाद जिल्हयाचे सीमांतर्गत बस वाहतूकीस परवानगी असेल. जिल्ह्याच्या सीमेबाहेर बस वाहतूक करता येणार नाही.
3. बसच्या प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी असेल.
4. बसच्या प्रत्येक नवीन फेरीपूर्वी व फेरी पूर्ण झाल्यानंतर बसची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
          5. बसचे चालक व वाहन यांनी नियमितपणे वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क, ग्लोव्हज, गॉगल्स, फेस शिल्ड, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
          6.बसमध्ये येणाऱ्या  प्रवाशांनीही मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे बंधनकारक राहील.
7. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.      
8. बसमध्ये चढत असताना तसेच बसमधून उतरत असताना प्रवाशांनी सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक राहील. यादृष्टीने प्रवाशांना सूचना देणे व आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना वाहकांना देण्यात याव्यात.
9. बस स्थानकांची व त्यांचे परिसराची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
10.बस स्थानकांवरील उपहारगृहे चालू ठेवण्यास परवानगी असणार नाही.
11. बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होणार नाही यादृष्टीने बसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे.
12.उस्मानाबाद जिल्ह्यातील कन्टेन्मेन्ट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) मध्ये बस वाहतूकीस परवानगी असणार नाही.
13. 65 वर्षाखालील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांना बसमधून प्रवासाची परवानगी असणार नाही.
14. बसचे चालक, वाहक यांना तसेच प्रवाशांना त्यांचे हाताने त्यांचे नाक, तोंड व डोळ्यांवर स्पर्श न  करणेबाबत सूचित करावे.
          15. बस स्थानकांवर ध्वनीप्रक्षेपक यंत्राद्वारे प्रवाशांना सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत सूचना द्याव्यात. कोविड-19 चा प्रादुर्भाव  होऊ नये यादृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या व वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना वारंवार देण्यात याव्यात. या सूचनांचे पालन करणेबाबत वारंवार सूचित करावे.
            16. सर्दी, खोकला ताप, श्वसनास त्रास इत्यादी लक्षणे आढळून येणाऱ्या चालक, वाहकांना, प्रवाशांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणीकरिता दाखल करण्यात यावे.
            17. शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. 

             या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

कोणत्या बस सुरु होणार ? 


No comments