“छुप्या मार्गाने पती- पत्नीचा जिल्हा प्रवेश, गुन्हा दाखल.”पोलीस ठाणे, येरमाळा: 1)ज्ञानोबा सोपान वाघमारे 2)नंदा ज्ञानोबा वाघमारे दोघे रा. बाभळगांव, ता. वाशी हे दोघे पती- पत्नी लॉकडाऊन काळात दि. 15.05.2020 रोजी पुणे ते बाभळगांव असा आडवाटेने, छुप्या मार्गाने पोलीस नाकाबंदीस टाळून विनापरवाना प्रवास करत, कोविड- 19 बाबत वैद्यकीय तपासणी न करता त्यांच्या गावी बाभळगांव येथे आले. यावरुन वरील दोघा पती- पत्नी विरुध्द भा.दं.वि. कलम- 188, सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 15.05.2020 रोजी नोंदवला आहे.


क्वारंटाईन इसमाचा सार्वजनिक वावर, दुकानात ग्राहकांची गर्दी, 3 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा: सचिन हनुमंत वायकर रा. सावरगाव, ता. तुळजापूर यांना त्यांच्या गावी प्रशासनाने होम क्वारंटाईन केलेले होते. क्वारंटाईन असतांनाही त्यांनी दि. 15.05.2020 रोजी नाका- तोंडास मास्क न लावता गावात सार्वजनिक ठिकाणी वावरुन निष्काळजीपणाचे कृत्य केले. तसेच, गुलाब तुकाराम बिराजदार रा. वागदरी, ता. तुळजापूर यांनी दि.14.05.2020 रोजी नाका- तोंडास मास्क न लावता गावात सार्वजनिक ठिकाणी फिरुन जनतेच्या जिवीतास धोका होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले.
तर आज दि. 16.05.2020 रोजी तुळजापूर येथील सराई धर्मशाळे जवळील स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांत सुरक्षीत अंतर न ठेवता दुकान चालक- राकेश रोहिदास भोसले यांनी ग्राहकांची गर्दी जमवली. यावरुन वरील तीघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 15.05.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments