Header Ads

पोलीसावरील ताण कमी करण्यासाठी होमगार्डना कामावर रुजू करावे - खा.ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्परतेने सेवा देत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उभे राहून अनावश्यक फिरणान्यांवर कारवाई करून  सेवा बजावत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा रिक्त जागांचा आलेख मोठा आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.

   जिल्हा प्रशासनाने पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्हयातील होमगार्ड यांना कामावर रुजू करून घेतल्यास लॉकडाउन काळात होमगार्डना रोजगार उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न मिटेल व पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. जिल्हयातील जास्तीत-जास्त होमगार्ड कर्मचारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावर रुजू करून घेण्यात यावे, असे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

No comments